शेतीशिवार टीम,16 डिसेंबर 2021:- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यात दहावी, आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.
यावेळी इयत्ता 10 वी ची लेखी परिक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या दरम्यान होणार आहे. तसेच 10 वी ची तोंडी परिक्षा 25 फेब्रुवारुि ते 14 मार्च या दरम्यान होणार आहे. तसेच 12 वी ची लेखी परिक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल यादरम्यान होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे. तसेच 12 वी ची तोंडी परिक्षा, प्रेक्टिकल परिक्षा14 फेब्रवारी ते 3 मार्च या दरम्यान होणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री गायकवाड यांनी केली आहे.
तसेच यंदा परिक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मागील काळात ज्या पद्धतीचा पेपर असायचा त्याच पद्धतीचा पेपर यावेळी असेल. मुल्यमापनसुद्धा यामागे ज्या पद्धतीने केले जायचे त्याप्रमाणे केले जाईल असे गायकवाड यांनी सांगितले आहे.
नमस्कार विद्यार्थी व पालक हो,
सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक आम्ही जाहीर करत आहोत.#SSCexams #HSCexams @msbshse @CMOMaharashtra @MahaDGIPR pic.twitter.com/ZWwQoKAbV8— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 16, 2021
10 वी च्या परिक्षांच्या तारखा :-
लेखी परिक्षा : 15 मार्च ते 18 एप्रिल
तोंडी परिक्षा : 25 फेब ते 14 मार्च

12 वी च्या परिक्षांच्या तारखा :-
लेखी परिक्षा – 4 मार्च ते 7 एप्रिल
तोंडी परिक्षा – 14 फेब ते 3 मार्च
