Share Market : अबब ! फक्त 12 रुपयांच्या ‘या’ शेयर्सने 1 लाखांचे एका वर्षात केले 20 लाख रु. तुमच्याकडं आहे का ?
शेतीशिवार टीम,16 डिसेंबर 2021 :- शेयर मार्केटमध्ये योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास खूप चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता वाढते. शेअर मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी लोकांना सहज लाखोपती बनवले आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा एका शेअर्सबद्दल सांगणार आहोत, ज्याने अवघ्या एका वर्षात खूप जास्त रिटर्न्स दिले आहेत.12 रुपयांच्या या शेअरने गुंतवणूकदारांचे नशीबच बदलून टाकलं आहे.
असाच एक पेनी स्टोक म्हणजे कॉस्मो फेरिट्रेस (Cosmo Ferritres). कॉस्मो फेरिट्रेस च्या शेयर्सनी अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. कंपनीच्या शेयर्सनी गेल्या 6 महिन्यात 750 % हुन अधिक रिटर्न्स दिले आहे.
काय आहे Cosmo Ferritres स्टॉकचा इतिहास :-
गेल्या एका महिन्यात कंपनीचा शेअर 225.70 रुपयांवरून 240 रुपयांवर पोहोचला. म्हणजेच या 30 दिवसांत कंपनीच्या शेअरने 6% रिटर्न्स दिले आहेत. तर या कंपनीच्या स्टॉकने 6 महिन्यांसाठी 750 % टक्के रिटर्न्स दिले आहेत.
यादरम्यान कंपनीचा शेअर 28.30 रुपयांवरून 240 रुपयांपर्यंत वाढला. त्याच वेळी, एक वर्षापूर्वी, कॉस्मो फेरिट्रेसच्या एका शेअरची किंमत फक्त 20 रुपये होती. तर आज तो 240 रुपये झाली आहे.
1 लाखांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला किती रिटर्न्स मिळाले :-
जर एखाद्याने महिनाभरापूर्वी त्यात 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज ते 1.06 लाख रुपये झाले असते. त्याच वेळी, जर कोणी हीच रक्कम 6 महिन्यांपूर्वी गुंतवली असती, तर आज तो त्याला 8.50 लाख रुपयांपर्यंत नफा झाला असता.
या शेअरवर वर्षभरापूर्वी एखाद्याने 1 लाख रुपयांची पैज लावली असती, तर आजच्या काळात त्याचे रिटर्न्स 20 लाख रुपये झाले असते.