मुंबई हायकोर्टात तब्बल 4629 पदांची मेगा भरती! 7 वी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी, पगार 1 लाख 23 हजारांपर्यंत, पहा अर्ज लिंक..
तिन्ही पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते पाहूया..
कनिष्ठ लिपिक पदांसाठी..
– उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे आणि त्याला प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे..
– उमेदवाराने सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा 40 शब्द प्रति मिनिट या वेगाने संगणक टायपिंग बेसिक कोर्स (GCC-TBC किंवा ITI) मध्ये सरकारी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. इंग्रजीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक आणि मराठीत 30 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक टायपिंग कौशल्य असणे आवश्यक आहे..
-उमेदवाराला M.S ऑफिस, M.S. Word मध्ये काम केल्याचा अनुभव असावा.
शिपाई या पदांसाठी..
उमेदवाराने इयत्ता 7 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा..
लघुलेखक (स्टेनोग्राफर) या पदांसाठी..
– उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे आणि त्याला प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.
– उमेदवाराने सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्यासोबत इंग्रजी टायपिंग व 30 शब्द प्रति मिनिट, मराठी लघुलेखन व 40 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टायपिंग व 30 शब्द प्रति मिनिट असावे. अधिक डिटेल्ससाठी अधिकृत नोटिफिकेशन पहा..
-उमेदवाराला M.S ऑफिस, M.S. Word मध्ये काम केल्याचा अनुभव असावा.
आवश्यक तारखा..
अर्ज करण्याची तारीख – 4 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2023
किती मिळणार पगार ?
स्टेनोग्राफर (ग्रेड-3) – रु. 38,600/- ते रु. 1,22,800 प्रति महिना
कनिष्ठ लिपिक – रु. 19,900 ते 63,200 रुपये प्रति महिना
शिपाई – 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना
वय मर्यादा :-
उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 38 वर्षे असावे.
अर्ज शुल्क :-
सामान्य उमेदवारांसाठी – रु 1000
SC/ST/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 900
पहा – Notification
अर्ज कसा कराल ?
मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in ला भेट द्या.
आता Recruitment टॅबवर क्लिक करा.
येथे संबंधित भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
आता New Registration वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.
विनंती केलेली माहिती प्रविष्ट करून अर्ज करा.
कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरल्यानंतर सबमिट करा..
अर्ज करण्यासाठी थेट लिंक :- नोंदणी फॉर्म
कशी आहे निवड प्रक्रिया..
उमेदवारांची निवड 7 टप्प्यांच्या आधारे केली जाईल. ज्यामध्ये ती वस्तुनिष्ठ टायपिंग टेस्ट / स्क्रीनिंग टेस्ट, इंग्रजी शॉर्टहँड टेस्ट, मराठी शॉर्टहँड टेस्ट, मराठी टायपिंग टेस्ट, इंग्लिश टायपिंग टेस्ट, क्लीनिंग ऍक्टिव्हनेस टेस्ट आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल..