अर्थसंकल्प 2023 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे, ज्यामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. सर्वात मोठी घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी आयकर स्लॅबमध्ये बदल केला आहे.
आता 7 लाखांच्या उत्पन्नापर्यंत एकही कर लागणार नाही. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात कोणत्या वस्तू स्वस्त केल्या जात आहेत आणि कोणत्या वस्तू महाग होत आहेत हेही सांगितलं. कोणत्या वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील आणि कोणत्या वस्तू कमी पैसे देऊन तुम्ही खरेदी करू शकाल ते जाणून घ्या..
बजेटमध्ये कोणत्या वस्तू केल्या स्वस्त..
– एलईडी टीव्ही
– कापड
– मोबाईल फोन
– खेळणी
– मोबाईल आणि कॅमेरा लेन्स
– इलेक्ट्रिक कार
– डायमंड ज्वेलरी
– बायोगॅसशी संबंधित वस्तू
– लिथियम सेल्स
– सायकल
बजेटमध्ये कोणत्या वस्तू झाल्या महाग..
– सिगारेट
– दारू
– सोने
– प्लॅटिनम
– विदेशी किचन चिमणी
– एक्स – रे मशीन
– आयात होणाऱ्या चांदीच्या वस्तू