Take a fresh look at your lifestyle.

Business Idea : नोकरीला रामराम ठोकला अन् शासनाकडून फक्त 60 दिवसांचं प्रशिक्षण घेतलं, आता घरी बसून वर्षाकाठी होतीये 7 लाखांची कमाई..

0

प्रत्येक व्यक्तीच्या मनात काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असते. काहींची ही इच्छा पूर्ण होते तर काहींची नाही. छत्तीसगडच्या मोनिता केराम यांनी कृषी विषयात पदवीचे शिक्षण प्राप्त केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोनिता यांनी खासगी नोकरी केली.

पण नोकरीत मन रमत नसल्यामुळे त्यांनी नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर त्यांनी घरी न बसता लगेच दोन महिन्यांचा कोर्स केला. कोर्स पूर्ण केल्यानंतर, मोनिता यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि आज त्या वर्षाला 5 लाख रुपयांहून अधिक नफा कमावत आहे.

छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मोनिता यांनी भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ घेतला. त्यांनी इंडियन सोसायटी ऑफ अँग्री-बिझनेस प्रोफेशनल्स (ISAP) कडून अँग्री क्लिनिक आणि अँग्री बिझनेस सेंटर योजनेअंतर्गत दोन महिन्यांचे प्रशिक्षण घेतलं.

या प्रशिक्षणात मोनिता यांनी एंटरप्रायझेसमधील आर्थिक व्यवस्थापनाची तत्त्वे, अकाउंटन्सीचे मूलभूत ज्ञान, विपणन, व्यवस्थापन, उद्योजकता विकास, संवाद कौशल्ये आणि प्रकल्प नियोजन याचे धडे गिरवले.

दोन महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मोनिता यांनी 25,000 रुपयांपासून आपल्या मशरूम लागवड व्यवसायाची सुरवात केली. त्यांनी त्यांच्या 10 x10 चौरस फुटांच्या कच्च्या घरात मशरूम शेती सुरू केली. त्यांनी मशरूमच्या बॅग्ज बनवण्यासाठी कमी किमतीची स्ट्रिंग वे प्रणाली वापरली.

यशराज, भावा मानलं तुला । ‘या’ तरुणाची मतिविना मशरूम शेती ; फक्त 45 दिवसातच कमावला 80 हजारांचा नफा…

स्थानिक बाजारपेठेतील गहू / तांदळाचा पेंढा काळजीपूर्वक निर्जंतुक करून आणि बाजारपेठेतून सहज उपलब्ध होणारे अंडे कंपोस्ट समान थरांमध्ये विभागले आणि प्रत्येक थरामध्ये स्पॉन पसरले आहे. मशरूम तयार होण्यास 30-35 दिवस लागतात. 8-10 आठवड्यांच्या कालावधीत 8 किलो प्रति चौरस मीटर प्रमाणे उत्पादन मिळते.

 

वर्षाला होतेय 7 लाखांपेक्षा जास्त कमाई… 

मोनिता मशरूमच्या लागवडीतून वर्षाकाठी 5 लाखांहून अधिक कमाई करत आहे. ऑयस्टर मशरूमच्या लागवडीतून त्यांना बंपर नफा मिळत आहे. मशरूमच्या लागवडीसोबतच मोनिता कन्सल्टन्सीचे कामही करते. 5 गावातील 150 हून अधिक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे त्या देत आहेत.

फक्त 50 हजारांत सुरु करा ‘मशरूम शेती’ ; 3 चं महिन्यात व्हाल लखपती, सरकारही देतंय 40% अनुदान !

मशरूम लागवड हा आजच्या काळात सर्वात फायदेशीर शेती व्यवसाय आहे, जो कमी गुंतवणूक आणि कमी जागेत प्रशिक्षण घेऊन सहज सुरू करता येतो. ऑयस्टर मशरूम हे तिसरे सर्वात मोठे लागवड केले जाणारे मशरूम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.