सोयाबीन उत्पादकांना अच्छे दिन ! ‘या’ बाजार समितीत सोयाबीनला 7,500 ते 9,000 रु. दर, पहा, आजचे सोयाबीन बाजारभाव..
तेलाच्या किंमती वाढल्याने सोयाबीनपासून तेल निर्मिती करणाऱ्या कंपन्याच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अश्या कंपन्यांचा व्यापाऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, मात्र, दिवाळीनंतर प्रत्यक्षात बाजारात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्री होत आहे. तरीही तेल कंपन्यांना मात्र त्यांच्या गरजेनुसार पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे.
यावरून व्यापारी साठेबाजी करत असल्याची शंका येत असल्याने तेल कंपन्या आता सोयाबीन खरेदीसाठी थेट बाजारात उतरल्या आहेत. त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार आहे.
लातूर नांदेडच्या तेल उत्पादक कंपन्या अहमदनगर – सोलापुरातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करण्यात रस दाखवत आहेत.देशभरातील सोयाबीन तेल उत्पादन करणाऱ्या कंपन्या सोयाबीन खरेदीसाठी महाराष्ट्रातल्या बाजारात उतरल्या आहेत. कंपन्यांमध्ये सोयाबीन खरेदीसाठी मोठी चढाओढ सुरू झाली. आहे.
चार हजार रुपये क्विंटल दराने सुरुवातीच्या काळात होणारी सोयाबीनची खरेदी दारात, गेल्या दीड महिन्यात सातत्याने वाढ होत आहे. देशभरातील व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीवर लक्ष केंद्रित केले आहे.
नांदेड बाजार समितीच्या आवारात सोयाबीनची खरेदी सुरु असून गेल्या दोन दिवसांत किमान 7,200 व कमाल 6,000 हजार रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीनची खरेदी करण्यात आली. शेतकऱ्यांना सोयाबीनचे भाव आणखी 8,000 ते 9,000 पर्यंत वाढतील अशी अपेक्षा असल्याने, शेतकरी सोयाबीन बाजारात आणायचे टाळत आहेत.
राष्ट्रीय बाजारात व्यापारी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करून त्याची साठेबाजी करत असल्याची करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाले तर जानेवारी फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या दरात दुप्पटीने वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला 7,500 ते 9,000 रुपये प्रति क्विंटल दर दिला जात आहे. लातूर, सोलापूर, नांदेड, हिंगोली येथे सोयाबीनला सध्या सरासरी 6,500 हजार रुपये भाव मिळत आहे.
बियाणांसाठी चढ्या दराने विक्री :-
यंदाच्या हंगामात अतिवृष्टीने राज्यातील सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने ओढ दिल्यामुळे सोयाबीनची वाढ झाली नाही, तर पिकलेले सोयाबीन निकृष्ट दर्जाचे आहे.
सोयाबीनला बाजारात चांगला दर मिळत असल्याने राज्यात उन्हाळी सोयाबीन लागवडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या सोयाबीन बियाणे खरेदीकडेही शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. बियाण्यासाठी शेतकरी 9 हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा जास्त दराने सोयाबीनची खरेदी करीत आहेत.
चीनमध्ये सोयाबीनचे घटले उत्पादन :-
सोयाबीनच्या उत्पादनात चीन नेहमी अव्वलस्थानी असतो. गेल्या काही वर्षापासून तेल उत्पादक कंपन्यांना चीनमधून सोयाबीन तेलासाठीचा कच्चामाल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत होता.
भारतीय बाजारपेठेच्या तुलनेत चीनमध्ये मिळणाऱ्या सोयाबीनचे दर कमी होते. मात्र, यंदा चीनमधील सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे तेल कंपन्यांना स्थानिक बाजारपेठेतून सोयाबीन खरेदी करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
त्यामुळेच येत्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात मोठी वाढ होण्याचे संकेत मिळाले आहे. दिवाळीनंतर हा दर सातत्याने वाढला आहे. भविष्यातही सोयाबीनच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे .