नियमितपणे आपल्या पिक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून 50,000 रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान दिले जाते. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना – 2019 अंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यास आता दुसऱ्या टप्प्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांना वेबसाईट वरील माहिती अपडेट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील जिल्हा सहकारी बँका, तसेच महाराष्ट्र, एसबीआय बँक, या बँकां मार्फत शेतकऱ्यांचा चुकीचा डाटा सहकार विभागाकडे देण्यात आला होता. त्यामुळे या बँकांच्या लाभार्थ्यांना वगळण्यात आलं होतं. आता या प्रक्रियेला जवळपास दीड महिना उलटून गेला होता. आता नवा डाटा वेबसाईटवर अपलोड करण्याचे निर्देश मिळाले आहे.

याबाबत जालना जिल्ह्यातील आतापर्यंत 39,354 शेतकऱ्यांचे खाते वेबसाईटवर अपलोड झाले आहे. पैकी ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे अश्या 14,155 शेतकऱ्यांच्या खात्यावर 31 कोटी 15 लाख रुपयांचे अनुदान शासनाकडून जमा करण्यात आले आहे.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफी देण्यात आल्यानंतर प्रोत्साहनपर अनुदानाचा मुद्दा मागील दोन वर्षांपासून प्रलंबित होता. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत होता. दरम्यान मंत्रीमंडळाने काही महिन्यांपूर्वी प्रोत्साहनपर अनुदानास मान्यता दिली आहे.

त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँका व त्यांच्याकडील प्रोत्साहनपर अनुदानास प्रात्र शेतकऱ्यांची माहिती एकत्रित करून कर्जमाफी योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश दिले आहेत.

बरेच सारे सरकारी कर्मचारी आहेत ज्यांना शासनाचे 25 हजार रुपये पेक्षा जास्त वेतन आहे असे कर्मचारी सुद्धा याच्यामधून वगळण्यात येत आहेत. याच बरोबर इन्कम टॅक्स भरणारे जे शेतकरी आहेत असे शेतकरी सुद्धा याच्यामधून वगळण्यात येत आहे.

आतापर्यंत जालना जिल्हा मध्यवर्ती व राष्ट्रीयीकृत बँका मिळवून 39,354 शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे . दरम्यान या योजनेअंतर्गत 2017-18, 2018-19 व 2019-20 हा कालावधीत गृहित धरण्यात आला होता.

2017-18 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीककर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास आणि 2018-19 वर्षातील अल्पमुदतीचे पीककर्ज 30 जून 2019 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास तसेच 2019-20 या वर्षातील अल्पमुदतीचे पीककर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत परतफेड केलेले असल्यास 2019-20 या वर्षातील अल्पमुदतीच्या रकमेवर 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

अल्पमुदत पीककर्जाची रक्कम 50 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीककर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार असल्याची माहिती सहायक निबंधक शरद तनपुरे यांनी दिली .

जालना जिल्हा – प्रोत्साहन अनुदान योजना पात्र लाभार्थी

बँक खाते अपलोड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या – 39,354

विशिष्ट क्रमांक प्राप्त कर्जखाते- 14,815

आधार प्रमाणिकरण पूर्ण कर्जखाती -14,155

आधार प्रमाणिकरण प्रलंबित कर्जखाते -660

प्रोत्साहनपर अनुदान प्राप्त शेतकरी – 12,257

शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा अनुदान -31 कोटी 15 लाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *