पुणे-अ.नगर -औरंगाबाद एक्सप्रेस-वे : नगर-औ.बाद हद्दीत 20-25Km अंतरात मोठा बदल, पुण्यातही काही ठिकाणी दिशा बदलणार रस्ता, पहा रोडमॅप..
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुणे-अहमदनगर -औरंगाबाद घोषणा केल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) भारतमाला प्रकल्पांतर्गत पुणे – औरंगाबाद एक्सप्रेस-वे च्या बांधकामाचा प्रस्ताव मंजूर केला होता. सध्या या महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.सध्याचा पुणे – नगर राज्य महामार्गावर प्रचंड असणारी गर्दीमुळे हा नवा राज्य महामार्ग State Highway 27 (Maharashtra) चा एक जलद पर्याय असणार आहे.
या पुणे – अहमदनगर – औरंगाबाद (संभाजीनगर) हा ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे होणार ही बातमी जेव्हापासून या तीन जिल्ह्यांत पसरली जाऊ लागली. त्यानंतर शेतीशिवार टीम ने प्रसिद्ध केलेली अलाइनमेंट ऑप्शन – 3 मुळे संपूर्ण रोडमॅप दिसला. त्यामुळे या बातमीला संमिश्र असा प्रतिसाद मिळत होता. पालकमंत्र्यांची जिल्हा लेव्हलवर झालेल्या बैठकीत अलायमेन्ट – 3 फायनल झाल्यानंतर काही शेतकरी जमीन जाणार म्हणून चिंतेत होते तर काही शेतकरी पैसे मिळणार म्हणून आनंदात…
मात्र, आता यामध्ये रिवाइज प्रपोजल (Revised Proposal) आल्याने या मार्गाची जागा काही ठिकाणी बदलल्याचे दिसून येत आहे. परंतु तो बदल फक्त जवळपास 15-20% झाला आहे.
या प्रस्तावित महामार्गामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. भूसंपादनात शेतकर्यांची जमीन किती जाणार ? मोबदला किती मिळणार ? रिवाइज प्रपोजल – kmz फाईल खरी की ? अलायमेन्ट ऑप्शन – 3 खरी..
तर मित्रांनो, अलायमेन्ट ऑप्शन – 3 खरी असल्याची माहिती खरी असून यामध्ये रिवाइज प्रपोजल आणून काही भूसंपादन प्रक्रियेत नद्या, ओढे, नाले, 4 पेक्षा जास्त असलेल्या विहिरी, घरे, ओलिताखालील जमिनी, बागायती जमिनी तसेच इतर काही गोष्टीमुळे बदल झाले आहे. ती एकत्रित फाईल ACAD-Drawing2-Model उपलब्ध आहे. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे ही फाईल उपलब्ध नसून आल्यानंतर त्या बाबतीत आपण अपडेट पाहणार त्यापूर्वी आपण कुठे कुठे महामार्गात बदल झाला आहे ? तसेच त्याचे अंतर आपण फोटोद्वारे दिलं आहे.
आपण गावांनुसार झालेला अंतरानुसार बदल आपण फोटोद्वारे खाली दिलेला आहे तो पहा..
पुणे जिल्ह्यात झालेला बदल पहा…
पुणे जिल्ह्यात कोरेगाव मूळ मधून रस्ता हलकासा डाव्या बाजूला वळलेला आहे. त्यानंतर पुढे नदी ओलांडून आपल्या पूर्वपदावर येत नंतर हिंगणगाव मधून उजव्या बाजूने जवळजवळ 200 मीटर पर्यंत हा रस्ता वळण घेतो. त्यानंतर देवकरमळ्या जवळून जाणाऱ्या भागात हा रस्ता पुन्हा उजव्या बाजूने वळण घेत आपल्या पूर्वपदावर येतो पुढे आपला जुना मार्ग कंटिन्यू करत हा रस्ता नदी ओलांडून हलकासा उजव्या बाजूने वळण घेत आपल्या पूर्व पदावर येत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात झालेला बदल पहा..
पुणे जिल्ह्यात कुकडी नदी ओलांडल्यानंतर हा रस्ता हलकासा डाव्या बाजूस वळण घेतो. नंतर हिंगणी दुमाला मध्ये प्रवेश केल्यानंतर हा रस्ता आपल्या पूर्व पदावर येतो. त्यानंतर खरातवाडी मध्ये हलकासा डाव्या बाजूला वळाल्यानंतर पुढे ढवळे वस्तीवर हा रस्ता आपला मुख्य मार्ग सोडून डाव्या बाजूने मार्गक्रमण करतो ही स्थिती पुढे पाडळी रांजणगाव ते कळमकर वाडी पर्यंत कायम राहते.
नंतर खिंड बाबुर्डी मध्ये हा रस्ता आपल्या पूर्वपदावर येतो. त्यानंतर थेट शिरढोण मध्ये थोडा उजवी बाजूने वळण घेऊन पुढे पारगाव भातोडी मध्ये हलकासा डाव्या बाजूने वळण घेऊन नंतर आपल्या पूर्व पदावर येतो.
त्यानंतर पुढे करंजी घाटामध्ये माणिक पीर बाबा दर्ग्याला डाव्या बाजूने वळसा घेत थेट प्रभू पिंपरी मध्ये डाव्या बाजूने हलकासा चेंज होतो त्यानंतर पुढे वडगाव मध्ये मात्र हा रस्ता उजव्या बाजूने 200 मीटर ते 1500 मीटर पर्यंत हा रस्ता सरकला आहे.
याची एकूण लांबी 20 ते 25 किलोमीटर असून खूप मोठे वळण घेत हा मार्ग कोळगाव, वरखेड, बेळगाव, प्रभू वडगाव, खडके, मडके, दादेगाव जहागीर ते थेट गोदावरी नदीपर्यंत आपली दिशा बदलत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात झालेला बदल पहा..
औरंगाबाद जिल्ह्यात पुढे बोरगाव तांडा मध्ये रस्ता हलकासा उजव्या बाजूने वळण घेत वरवंडीतून आपल्या पूर्व पदावर येतो पुढे परदरी आणि चिंचोली भागामध्ये रस्ता आधी डाव्या बाजूला वळण घेतो नंतर पुढे आडगाव बुद्रुक मध्ये रस्ता उजव्या बाजूने मार्गक्रमण चालू करतो
हा रस्ता पुढे झाल्टा मधून टाकळी शिंपी आणि सुंदरवाडी या गावांच्या मधून हिरापूर गावच्या शिवारा मधून रामपूर मल्हारपूर असा होत पुढे समृद्धी महामार्गाला मिळत आहे.