पुणे-औरंगाबाद एक्सप्रेस-वे : महामार्गात काही ठिकाणी बदल, जमीनदारांचा संभ्रम झाला दूर, Revise Proposal – Alignment-3 चा एकत्रित पहा रोडमॅप..
पुणे – अहमदनगर-औरंगाबाद (संभाजीनगर) हा ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे होणार ही बातमी जेव्हापासून या तीन जिल्ह्यांच्या परिसरात पसरली आहे तेव्हापासून या बातमीला संमिश्र असा प्रतिसाद मिळत आहे. सुरवातीला हा प्रस्तावित मार्ग कोणत्या भागातून जाणार याबाबत संभ्रम, नंतर नेमकी शेतकर्यांची किती जागा जाणार? मोबदला किती मिळणार ? याबाबतीत जमीनदार शेतकरी वर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे,
आता पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी भूसंपादनास सुरवात झाल्याचे दिसत असले तरी मात्र, अहमदनगर – संभाजीनगर जिल्ह्याचं काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस – वे साठी NHAI ला भूसंपादनाबाबतीत पत्रक पाठवून संमती मिळवली होती. त्यामुळे तिथे भूसंपाद सुरु झालं आहे.
तर याबाबत औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्वाची माहिती समोर आली आहे. या दोन जिल्ह्यांच्या भूसंपादनाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसून हे अधिकारी वरिष्ठांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत. याला आणखी एक महत्वाचे कारण असल्याचे म्हटले जात आहे ते म्हणजे या मार्गाचे जिओ -लोकेशन.
जवळपास एक दीड महिन्यापूर्वी रस्त्याच्या बाबतीत काही अलायमेन्ट समोर आली होती. या अलायमेन्ट ऑप्शन – 3 नुसार NHAI च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महसूलमंत्री तथा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर प्रात्यक्षित करून दाखवलं होतं.
या महामार्गाबाबत अलायमेन्ट – 3 फायनल झाल्यानंतर काही शेतकरी जमीन जाणार म्हणून चिंतेत होते तर काही शेतकरी पैसे मिळणार म्हणून आनंदात. मात्र आता यामध्ये रिवाइज प्रपोजल (Revised Proposal) आल्याने या मार्गाची जागा काही ठिकाणी बदलल्याचे दिसून येत आहे. याला काही अडथळे आहेत जसे की, या मार्गात येणाऱ्या नद्या, ओढे, नाले, 4 पेक्षा जास्त असलेल्या विहिरी, घरे, ओलिताखालील जमिनी, बागायती जमिनी तसेच इतर काही गोष्टी.
पहिली जी अलायमेन्ट – 3 प्रसारित करण्यात आली होती त्यामध्ये हा महामार्ग अनेक छोट्या मोठ्या ओढ्यांमधून तसेच शेतकऱ्यांच्या विहिरी आणि घरांवरून जात होता यामुळे महामार्गाचे भूसंपादन करण्यात अडचण येणार हे स्पष्ट दिसत होते, हीच गोष्ट लक्षात घेऊन या महामार्गाची दिशा काही ठिकाणी वळवण्यात आली आहे जेणेकरून रस्त्यात येणाऱ्या विहिरी, घरे आणि ओढे यांना वाचवता येईल.
आता या पुणे – अहमदनगर औरंगाबाद ग्रीनफिल्ड महामार्गात जो काही बदल झाला आहे. तो अलायमेन्ट – 3 आणि रिवाइज प्रपोजल (Revised Proposal) एकत्रितरित्या गुगल – अर्थ वर ओपन केल्यास तुम्हाला संपूर्ण महामार्गात झालेला बदल दिसून येईल.. ही संपूर्ण फाईल एकत्रित तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा त्या ठिकाणी आपण लिंक शेअर करणार आहोत..
लिंक :– chat.whatsapp.com
कसा आहे प्रस्तावित मार्ग :-
पुणे-अहमदनगर-औरंगाबाद(संभाजीनगर) या ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेची सुरवात पुणे रिंग रोड प्रॉजेक्टपासून होणार असून औरंगाबादमधील शेंद्रा MIDC येथे हा मार्ग समृद्धी मार्गाला जोडला जाणार आहे.
या महामार्गाची 100 मीटर रुंदीप्रमाणे या मार्गासाठी जमीन लागणार आहे. यासाठी नेमकी किती जमीन संपादित करावी लागेल हे आराखडा पूर्ण झाल्यास स्पष्ट होईल. मात्र जमीन संपादनाची जबाबदारी MSRDC ची असणार आहे.
पैठण, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर, पुरंदर, हवेली, शिरूर या तालुक्यांमधून हा मार्ग जाणार आहे. या मार्गाला रांजणगाव आणि बिडकीन अशी दोन प्रवेशद्वारे असणार आहेत. मात्र हा मार्ग प्रवेश नियंत्रण मार्ग (Access Control Road) असणार असल्याने दोन प्रवेशद्वार वगळता इतर कुठून या मार्गावर प्रवेश करता येणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
अशा या महत्त्वाकांक्षी मार्गाच्या आराखडय़ाचे काम मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे NHAI चे नियोजन आहे. आराखडा पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून जून 2023 मध्ये कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न असल्याचेही NHAI मधील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
किती येणार खर्च :-
10 हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी पुणे, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील गावांमधील जमीन मोठय़ा संख्येने संपादित करावी लागणार आहे. या जमिनींच्या भूसंपादनातून जमीनदारांना 6000 कोटींचा मोबदला मिळणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
त्यानुसार राज्य सरकार, NHAI आणि MSRDC मध्ये चर्चा झाली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यानंतर राज्य सरकार, NHAI आणि MSRDC यांच्यामध्ये यासंबंधी करार होणार आहे. MSRDC तील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला.
[…] […]