Take a fresh look at your lifestyle.

पुणे, ठाण्यासह ‘या’ जिल्ह्यात 3 दिवसांत 2.50 कोटींची वीजचोरी उघड, तुम्हीही वीज वापरताना या 5 चुका करताय का ? होऊ शकतो 5 वर्षांचा तुरुंगवास..

0

वीजचोरी करणाऱ्या वीज ग्राहकांच्या विरोधात महावितरण आक्रमक झाली असून गेल्या एका आठवड्यात कोकण, पुणे, औरंगाबाद व नागपूर परिक्षेत्रातील विविध ठिकाणी घालण्यात आलेल्या धाडीमध्ये 198 वीजचोरांना दणका देत अंदाजित 2 कोटी 50 लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात यश मिळवलं आहे.

यात सर्वाधिक 10 वीजचोऱ्या एकट्या ठाणे शहरातील आहेत. मोठ्या प्रमाणात विजेचा वापर करूनही वीज ग्राहकास कमी रकमेचे देयक कसे जाते अशा ग्राहकांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले होते.

मोठ्या प्रमाणात विजेचा वापर करून येणाऱ्या मोठ्या रकमेचे देयक टाळण्यासाठी वीजचोरांनी त्यांच्याकडे असलेल्या मीटरमध्ये फेरफार केला असावा, असा संशय आल्याने महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकाने मीटरची तपासणी करण्यासाठी विविध पथके तयार केली.

या पथकांनी नागपूर, औरंगाबाद, पुणे व कोकण परिक्षेत्रातील विविध ठिकाणी धाडी टाकून जास्त वीज वापर असलेल्या मात्र कमी वीज बिल येणाऱ्या वीज ग्राहकांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत.

या सर्व मीटरची तपासणी केली असता जवळपास सर्वच वीज ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. हे सर्व मीटर जप्त करून त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली असता या सर्वच 198 वीज ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. एकट्या कोकण परिक्षेत्रातील वीजचोरीचे मूल्यांकन करण्यात आले आहे.

वीजचोरीची रक्कम भरण्यासाठी ग्राहकांना नियमानुसार मुदत देण्यात आली असून विहित कालावधीत या ग्राहकांनी वीज बिलाची रक्कम भरली नाही तर त्यांच्याविरुद्ध विद्युत कायदा- 2003 नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

वीजचोरी करणे हा दंडनीय अपराध आहे. वीजचोरीचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास वीजचोरी करणाऱ्या ग्राहकास सश्रम कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

अनधिकृत वीज वापर व वीज चोरी

वीज सेवेच्या दर्जाबद्दल बोलताना आपण पाहिलेच की, अनधिकृत वीज वापर व वीज चोरी यासाठी स्वतंत्र तरतुदी केलेल्या आहेत. वीज कायद्यातील दुरुस्तीनुसार (इलेक्ट्रीसिटी अमेंडमेट अँटी , 2007, 16 जून 2007) यासंदर्भातील तरतुदी अधिक जाचक करण्यात आल्या आहेत.

अनधिकृत वीज वापर व वीज चोरीमधील फरक अस्पष्ट असल्याने त्याद्वारे वीज कंपनीकडून ग्राहकांना त्रास होण्याची शक्यता वाढली आहे. या प्रकरणात आपण या अंतर्गत येणाऱ्या तरतुदींची थोडक्यात माहिती करून घेऊ.

9.1 अनधिकृत वीज वापर ( वीज कायदा कलम 126 )

वीज कायद्यातील कलम 126 नुसार ग्राहकाने केलेला खालीलपैकी कोणताही वीज वापर हा अनधिकृत समजला जाऊ शकतो.

1) कोणत्याही अनधिकृत साधनाने किंवा पद्धतीने केलेला वीज वापर (उदा. हूक किंवा आकडा टाकून, मीटर बायपास करून इ.)

2) मीटरमध्ये मुद्दाम फेरफार करून केलेला वीज वापर ( उदा. मीटर हळू करणे, मीटर मध्ये बिघाड करणे इ.)

3) परवानगी दिलेल्या कारणांशिवाय इतर कारणांसाठी केलेला वीज वापर (उदा . घरगुती कारणासाठी घेतलेली वीज बिगर घरगुती कारणांसाठी वापरणे)

4 ) परवानगी असलेल्या जागेशिवाय इतर जागेसाठी केलेला वीज वापर (उदा . शेजारील घराला आपल्या घरातून वीज देणे.)

दंड व शिक्षेबद्दल काय आहे तरतूद..

वीज चोरी करणाऱ्या ग्राहकाला होणारी शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही हे त्याने किती प्रमाणात वीज चोरी केली आहे यावरून ठरते. जर वीज चोरीच्या विद्युत भाराचे प्रमाण 10 कि.वॅ. (kW) पेक्षा कमी असेल, तर अशा ग्राहकांकडून पहिल्यांदा दंड आकारला जातो.

ग्राहकाकडून पहिल्यांदा केलेल्या वीज चोरीच्या बाबतीत तिपटीने आणि दुसऱ्यांदा सहापटीने दंडाची रक्कम वसूल केली जाते. त्याने केलेल्या वीज चोरीचा विद्युतभार जर 10 कि.वॅ. (KW) पेक्षा जास्त असेल तर पहिल्यांदा अशा ग्राहकांकडून तिपटीने व दुसऱ्यांदा सहापटीने दंडाची रक्कम वसूल केली जाते. पण त्याचबरोबर दुसऱ्यांदा केलेल्या वीज चोरीसाठी त्याला कमीत कमी सहा महिने तर जास्तीत जास्त पाच वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

तसेच तो 3 महिने ते दोन वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी कोणत्याही वीज कंपनीकडून वीज पुरवठा होण्यास अपात्र ठरवला जातो. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विशेष न्यायालयामार्फतच वीज चोरीच्या गुन्ह्यावर कारवाई केली जाते. परंतु वीज चोरी अंतर्गत असलेल्या तरतुदी अनधिकृत वीज वापरासाठी वीज कंपनी वापरू शकत नाही हे लक्षात घ्यावे (सप्लाय कोड , विनियम 2005, विनियम 8.5)

तडजोडीची रक्कम

वीज चोरी अंतर्गत गुन्हा मान्य करून ग्राहकाला तडजोडीची रक्कम भरता येते. ही रक्कम प्रति कि.वॅ. (kW) घरगुती ग्राहकांसाठी 4,000 रु. कृषी ग्राहकांसाठी 2,000 रु आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी 10,000 रु. इतकी आहे.

अशी रक्कम भरलेल्या ग्राहकाची तुरूंगातून लगेचच सुटका होऊ शकते. तसेच कोणत्याही न्यायालयात त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही. परंतु प्रत्येक ग्राहकास फक्त एकदाच ही तडजोड़ रक्कम भरता येते, हे लक्षात ठेवावे.

ग्राहकांनी नोंद घ्यावी असे काही..

अनधिकृत वीज वापरासाठी ग्राहकाकडून दुप्पट दराने दंड वसूल केला जातो व ही रक्कम अशा वीज वापराच्या संपूर्ण कालावधीसाठी ठरवली जाते.

अनधिकृत वीज वापरासंबंधी दंडाची अंतिम रक्कम ठरवण्यापूर्वी तपासणी अधिकाऱ्यास ग्राहकाचे म्हणणे ऐकून घ्यावे लागते. अंतिम आदेशानंतर 30 दिवसांच्या आत ग्राहकाला दंडाची रक्कम भरावी लागते.

वीज चोरी हा अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यासाठी ग्राहकाला सहा महिने ते तीन वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

वीज चोरी करणाऱ्या ग्राहकाकडून प्रथम तिपटीने व नंतर सहा पटीने दंडाची रक्कम वसूल केली जाते.

वीज चोरी अंतर्गत गुन्हा मान्य करून ग्राहकाला तडजोडीची रक्कम भरता येते.

Leave A Reply

Your email address will not be published.