गेल्या काही वर्षांपासून देशभरात प्रोटीनचा वापर पूर्ण करण्यासाठी अंड्याची मागणी वाढत आहे. सामान्य कोंबडीची अंडी खरेदी करण्याऐवजी लोक आता कडकनाथची अंडी आणि मांस खरेदी करत आहेत. कडकनाथ कोंबडा ग्राहकांमध्ये उगाच इतका फेमस नाही ये ! कडकनाथ कोंबडीची त्वचा, पिसे, मांस आणि रक्तही काळसर आहे. तसेच या कोंबडीचे मांस कोलेस्टेरॉल आणि फॅटलेस आहे.
परंतु, कडकनाथ कोंबडीची अंडी आणि मांस इतर कोंबड्याच्या तुलनेत खूप महाग आहे. त्याचे एक अंडे सुमारे 30 ते 50 रुपयांमध्ये आणि कोंबडयाची 900 ते 1100 रुपये किलो दराने विक्री होत आहे. परंतु तरीही शहरी भागांमध्ये प्रोटीनमुळे खूप मोठी मागणी आहे. याबाबत आता देशातल्या मध्यप्रदेश सरकारने आता कडकनाथ योजना पालन सुरु केली असून आदिवासी महिलांसाठी कडकनाथ संगोपन युनिट स्थापन करण्यासाठी मदत करत आहे.
मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातून येणाऱ्या कडकनाथला सरकारकडून जीआय टॅग मिळाला आहे. येथे पशुसंवर्धन विभागाने कडकनाथ संगोपनासाठी एक विशेष योजना सुरू केली असून त्याअंतर्गत आदिवासी महिलांना कडकनाथचे संगोपन करून उपजीविका करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. या महिलांना आता कुक्कुटपालनासाठी राज्य सरकारकडून 1 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळत असून यामध्ये 100 पिल्ले सरकारकडून शेड, भांडी, धान्य यासोबतच कडकनाथ संगोपनाचे प्रशिक्षण दिलं जात आहे.
सतना जिल्ह्यातील उचेहरा विकास गटातील अनेक गावातील महिलांनी कडकनाथ कुक्कुटपालन योजनेचा लाभ घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदिवासी बहुल गावांमध्ये गोब्राँव काला, पिथोराबाद, धनेह, जिगनहाट, बांधी, मौहर आणि नरहाटी या आदिवासी महिलांसाठी सुमारे 30 कडकनाथ पोल्ट्री युनिट्सची स्थापना करण्यात आली आहे.
त्यांना पहिल्या टप्प्यात 40-40 कडकनाथ पिल्ले आणि 58 किलो उच्च दर्जाचे पोल्ट्री फीड देण्यात आले आहे. लाभार्थी रुमी कोल सांगतात की, या योजनेमुळे आमची समृद्धी झाली आहे. आपल्या कुटुंबाला पौष्टिक अन्न तर मिळेलच, पण आमचे उत्पन्नही अनेक पटींनी वाढणार आहे.
कडकनाथ कोंबडीची काय आहे, खासियत
कडकनाथ कोंबडीची कातडी, पिसे, मांस आणि रक्त सर्व काळे आहे. पांढऱ्या कोंबडीच्या तुलनेत त्यात कोलेस्टेरॉलची पातळी खूपच कमी असते, फॅटचे प्रमाण कमी असल्याने हृदय आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर मानलं जातं. कमी चरबी, रोगप्रतिकारक शक्तीसह प्रोटीन समृद्ध, कार्डिओ-रेस्पीरेटरी आणि अँनिमिक रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
कडकनाथ कोंबडीची काय आहे, खासियत
कडकनाथ कोंबडीची कातडी, पिसे, मांस आणि रक्त सर्व काळे आहे. पांढऱ्या कोंबडीच्या तुलनेत त्यात कोलेस्टेरॉलची पातळी खूपच कमी असते, फॅटचे प्रमाण कमी असल्याने हृदय आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर मानलं जातं. कमी चरबी, रोगप्रतिकारक शक्तीसह प्रोटीन समृद्ध, कार्डिओ-रेस्पीरेटरी आणि अँनिमिक रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
कडकनाथसाठी अनुदान आणि उत्पन्न :-
कडकनाथ कुक्कुटपालनासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन योजना सुरू केली असून त्यामध्ये कुक्कुटपालन प्रकल्पांतर्गत 25 लाख रुपयांच्या अर्थसहाय्याची तरतूद आहे. याशिवाय इच्छुकांना बँक कर्ज, नाबार्ड कर्ज आणि इतर अनेक वित्तीय संस्थांकडून स्वस्त दरात कर्ज मिळते. एका अंदाजानुसार, कडकनाथ कुक्कुटपालन करून वार्षिक 35 लाख रुपये कमवू शकतात.
तुम्हालाही कडकनाथ पोल्ट्रीचे युनिट्स स्थापन करायचं असेल अन् शासनाच्या 25 लाखांपर्यंत कर्ज मिळवायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकवर याबाबत पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रोसेस बद्दल जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.