जर तुम्ही कमी गुंतवणुकीमध्ये एखादा चांगला व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास बिझनेस आयडिया आम्ही घेऊन आलो आहोत. एका असा व्यवसाय ज्याची सुरुवात कमी गुंतवणुकीने करता येईल आणि त्यातून चांगली नफा देखील कमवता येईल. या व्यवसायात जे प्रॉडक्ट तुम्ही बनवणार आहात ते तुमच्या दैनंदिन आहाराशी निगडित असेच आहे, ही अशी गोष्ट आहे ज्याची मागणी वर्षानुवर्षे प्रत्येक घर, रेस्टॉरंट, हॉटेलवर चालूच असते. ते म्हणजे बेसनपीठ..
बेसनपीठ हा एक असा पदार्थ आहे जो देशातील प्रत्येक शहरात आणि गावात विविध खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरले जाते. बेसनपीठ हे प्रामुख्याने हरभरा डाळीपासून बनवले जाते. भारतामध्ये प्रत्येक दुकानात, शॉपिंग मॉलमध्ये बेसनपीठ हवेच, हवे असते. अशा परिस्थितीत बेसन मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करणे फायदेशीर ठरू शकते.
व्यवसाय सुरु करण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात..
सर्वप्रथम बेसनपीठाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी, ते Agmarked असले पाहिजे. बेसनपीठ नेहमी चांगल्या दर्जाच्या फूड ग्रेड पॉलिथिन पिशव्यांमध्ये पॅक केले गेले पाहिजे. जेणेकरून आपले बेसनपीठ स्थानिक बाजारपेठ, खाजगी दुकाने, सहकारी संस्था, अश्या वेगवेगळ्या माध्यमांमार्फत विक्री करता येईल. बेसनपीठ सहजपणे बनवता येते, आणि ते तुम्हाला चांगली कमाई देखील करून देऊ शकते.
व्यवसाय सुरु करण्यासाठी किती लागेल भांडवल
ग्रामोद्योग रोजगार योजनेअंतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC) ने बेसनपीठ उत्पादन युनिटवर एक प्रकल्प तयार केला आहे. या अहवालानुसार, एक बेसनपीठ उत्पादन युनिट उभारण्यासाठी एकूण 7,80,000 रुपये इतका खर्च येणार आहे. या प्रकल्प अहवालानुसार, बेसनपीठ उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी तुमच्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
यासाठी सुमारे 3 लाख रुपये खर्चून 1500 चौरस फूट इमारतीचे शेड तयार तयार करावे लागणार आहे. याशिवाय एक पीठ गिरणी, पल्व्हरायझर, बेल्ट, चाळणी, भांडी, चाळणी यंत्र इत्यादी उपकरणांवर 3 लाख रुपये खर्च खर्च होतील असे हा अहवाल सांगतो.
या व्यवसायात एकूण भांडवली खर्च रु.6,00,000 इतका असेल. त्याच वेळी 1,80,000 रुपयांचे खेळते भांडवल आवश्यक असेल. अशा प्रकारे एकूण प्रकल्पाची किंमत 7.80 लाख रुपये होते.
कर्ज घेऊन देखील व्यवसाय सुरु करू शकता..
तुमच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसतील, तर तुम्ही पीएम मुद्रा कर्ज योजनेद्वारे कर्ज घेऊ शकता. या प्रकल्प अहवालाच्या आधारे तुम्ही बँकेकडे कर्जासाठी अर्ज करू शकता.
किती होईल नफा..
खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC) च्या मते, एका युनिटद्वारे दरवर्षी कमीत कमी 299 क्विंटल बेसनाचे उत्पादन घेतले जाऊ शकते. 5,000 रुपये प्रति क्विंटल बाजारभावा नुसार याचे एकूण मूल्य 14,95,000 रुपये होईल. जर तुम्ही 100% क्षमतेचा वापर करून उत्पादन केले तर वार्षिक 14,95,000 लाख रुपयांचे उत्पादन होईल. यामुळे तुमचा वार्षिक निव्वळ नफा रु. 4,35,000 असेल. अंदाजे निव्वळ नफा मासिक आधारावर काढला तर तुम्हाला 35,000 ते 45,000 रुपये इतका मासिक नफा होईल.