भारतमाला प्रकल्पांतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) पुणे बंगळुरू ग्रीनफिल्ड महामार्गासाठीच्या बांधकामाचा प्रस्ताव मंजूर केला असून भूसंपादनाची प्रक्रिया देखील देखील सुरू केली आहे. हा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे सध्याच्या राष्ट्रीय महामार्ग 48 (जुना NH 4) चा एक जलद पर्याय असणार आहे. आणि त्यामुळे वाहतूक आणि गर्दी कमी होईल अशी अपेक्षा आहे. या महामार्गावरून120 किमी प्रतितास या वेगाने वाहने धावू शकतील. नवीन पुणे बंगळुरू ग्रीनफिल्ड एक्सप्रेस – वे हा आठ लेनचा प्रवेश नियंत्रित एक्सप्रेस – वे असणार आहे.
नव्या पुणे बंगळुरू ग्रीनफिल्ड एक्सप्रेस – वे मुळे पुणे ते बंगळुरू हे अंतर 95 किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे पुणे आणि बंगळुरू दरम्यानचा प्रवास 7 ते 8 तासांपर्यंत कमी होणार आहे. सध्याचा पुणे बंगळुरू महामार्ग कापण्यासाठी 11 ते 12 तास लागतात. विशेष म्हणजे या महार्गावर विमानाची धावपट्टी देखील असणार आहे. विमानाची धावपट्टी (Airplane runway) असलेला हा राज्यातील पहिला राष्ट्रीय महामार्ग ठरणार आहे.
हा महामार्ग महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातून सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील दुष्काळी भागातून हा मार्ग कर्नाटक राज्यात जाणार आहे. पुणे बंगलोर एक्सप्रेस-वे हा आठ पदरी ग्रीनफिल्ड महामार्ग वारवे बुद्रुक येथून सुरू होईल. सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण आणि खटाव आणि सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ मिरज तालुक्यातून जाणार असून गावांची व शेतकऱ्यांची नावे जाहीर होऊन भूसंपादनाला सुरुवात झाली आहे. यानंतर पुढे हा महामार्ग कर्नाटकात बेलगावी, बागलकोट, गदग, कोप्पल, बल्लारी, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूर या मार्गे बंगळुरूला जोडला जाणार आहे.
नुकत्याच प्रकाशित झालेल्या भारतीय राजपत्रात सातारा जिल्ह्यातील खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील गावांची नावे जाहीर झाली आहेत. लवकरचं इतरही तालुक्यातील गावांची नवे जाहीर होण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्यातील या गावांचा आहे समावेश :-
मान-खटाव, कोरेगांव तालुक्यातील गावे – अंतर 50.65km ते 126.57km
1) डिस्कळ
2) चिंचणी,
3) काळेवाडी
4) शिंदेवाडी,
5) ललगुण,
6) बुध
7) काटेवाडी
8) फडतरवाडी
9) बुद्रुक
10) फडतरवाडी
11) वेटणे
12) पुसेगाव,
13) कटगुण,
14) खटाव (कसबा)
15) दरूज,
16) धाकरवाडी
17) भुरकरवाडी
18) वडूज
19) वाकेश्वर
20) कुरळी
21)सिद्धेश्वर
22) उंबर्डे
23) नायकाची वाडी
24) गुरसाळे
25) शिरसवडी
26) मरडवाक
27) मोराळे,
28) पोपळकरवाडी
29) शेंडगेवाडी वाय
30) गुंडेवाडी
31) मायणी
32) गोरेगाव
33) निमसोड
34) अनपटवाडी
35) अंबवडे.
कोरेगाव तालुक्यातील गावे :-
1) हासेवाडी,
2) नागेवाडी,
3) भाडळे,
4) बोधेवाडी,
5) भाडळे फॉरेस्ट.
सातारा जिल्ह्यातील गावांच्या नावांचे राजपत्रक पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
सांगली जिल्ह्यातील गावांची नावे पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
पुणे – बंगळूर ग्रीनफिल्ड महामार्गाबाबत सातारा जिल्ह्याप्रमाणे, सांगली जिल्ह्यातल्या गावांची नावे जाहीर झाली आहेत त्याचेही भूसंपादन सुरु झालं असून याबाबत Road Map Alignment म्हणजेच हा महामार्ग या तिन्ही जिल्ह्यांतून कसा जाणार त्याचा संपूर्ण नकाशा ही उपलब्ध झाली आहे. तसेच येत्या काळात शेतकऱ्यांची नावे गट नंबर / सर्व्हे नंबर, बाबत माहिती जाणून घेणार आहोत.
त्यामुळे तुम्हाला संपूर्ण Road Map Alignment पाहायची असेल तर आमच्या व्हॉट्स अँप ग्रुपला जॉईन व्हा त्या ग्रुप वर तुम्हाला Alignment मिळेल, जॉईन होण्यासाठी :- इथे करा क्लिक