शेतकऱ्यांनो, फक्त एकरभर पडीक जमिनीत ‘ही’ 400 रोपे लावा, लाखात नाही तर कोटीत कमवाल, पहा लागवडीबद्दल सर्वकाही..
जर तुम्हीही करोडपती होण्याचं स्वप्न पाहत असाल अन् ते सहजरित्या पूर्ण करण्याचा विचार करत असाल तर स्मार्ट फार्मिंगद्वारे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. यासाठी जास्त मेहनत आणि मोठ्या खर्चाची गरज नाही. पण हो, थोडा धीर धरायला हवा. तुम्ही ऐकलं असेलच की उत्पादनाला मागणी जास्त असते, पण पुरवठा कमी असेल तर त्याची किंमतही जास्त असते. अशी एक वनस्पती आहे, ज्याची आपल्या देशात मागणी जास्त आहे, परंतु उपलब्धता खूपच कमी आहे.
देश – विदेशांत सागवानाला मोठी मागणी..
सागवान लाकडापासून बनवलेल्या फर्निचरला देशात आणि परदेशात चांगली मागणी आहे. हे घर आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी वापरलं जातं. मात्र गरजेनुसार, सागवान लाकडाची मागणी पूर्ण होत नाही. त्यामुळे सागवान लाकडाचे भाव खूप वाढले आहेत. साग हा लाकडाचा राजा म्हणूनही ओळखला जातो. परंतु, व्यावसायिक कारणांसाठी चांगल्या प्रतीच्या सागवान लाकडाला जास्त मागणी आहे.
चांगल्या प्रतीच्या सागवानात कमवू शकता बंपर नफा..
सागवान लाकडाला जगभरात खूप मागणी आहे, पण उत्पादन कमी आहे. अशा परिस्थितीत, संधीचा योग्य वापर करून, आपण सागवान शेतीतून पैसे देखील कमवू शकता. मात्र, यासाठी सुमारे 14 किंवा 15 वर्षे वाट पाहावी लागेल. उत्तम सिंचन, सुपीक जमीन आणि शास्त्रोक्त व्यवस्थापन यातून सागवान लागवडीमध्ये दर्जेदार लाकूड तयार होतं. तज्ज्ञांच्या मते, एका एकरात चांगल्या दर्जाची सुमारे 400 झाडे तयार होऊ शकतात. रोपे लावताना एकमेकांमध्ये 9/12 फूट अंतर ठेवावे..
भारतातील सागाचे प्रकार :-
निलांबर (मलबार) साग
दक्षिण आणि मध्य अमेरिकन सागवान
पश्चिम आफ्रिकन सागवान
आदिलाबाद साग
गोदावरी साग
कोनी टीक
सागवान पासून किती मिळेल उत्पन्न :-
जर तुम्हाला सागवान शेती करायची असेल तर तुम्हाला सुमारे दीड दशक म्हणजे 14 किंवा 15 वर्षे संयम हवा. कारण एक सागवान 14 वर्षात 10 ते 15 घनफूट लाकूड देते. साधारणपणे, सागाचे मुख्य देठ 30 फूट उंच आणि सुमारे 40-45 इंच जाड असते.
सागाच्या उत्तम उत्पादनासाठी गाळाच्या जमिनीत शेती करावी. चांगल्या शेतीसाठी चुनखडी, स्लेट, कवच, भुसा आणि काही ज्वालामुखीय खडक जसे बेसाल्ट मातीत मिसळावेत.
सागवानाच्या झाडापासून किती होईल कमाई :-
10 ते 15 वर्षे जुन्या सागवानाच्या झाडाची किंमत सुमारे 30 ते 40 हजार रुपयापर्यंत जाते. जर झाड 15 वर्षांपेक्षा जास्त जुने असेल तर त्याची किंमत जास्त असेल. कारण जुन्या झाडांची किंमत जास्त असते. अशा स्थितीत एकरी 1 कोटींहून अधिक उत्पन्न मिळू शकतं.
एका एकरात 400 सागवान झाडे लावली आणि 15 वर्षांनंतर एका झाडाची सरासरी किंमत 30 हजार रुपये असेल तर तुम्हाला 1 कोटी 20 लाख रुपये
तुम्हालाही सागवान झाडांची शेती करायची असेल तर या लिंकवरून https://dir.indiamart.com/impcat/teak-plants.html तुम्ही रोपे मागवू शकता..