DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मकर संक्रांतीला मोठं गिफ्ट ! ‘या’ दिवशी खात्यात येणार लक्ष्मी, तर मूळ पगारही 26 हजारांवर पोहचणार..
केंद्रीय कर्मचार्यांसाठी 2023 ची पहिली खुशखबर मिळणार आहे कारण या महिन्यात महागाई भत्त्याची घोषणा केली जाणार आहे. मात्र, यात अजून थोडा वेळ आहे. पण, त्यांना किती महागाई भत्ता मिळणार, हे आता निश्चित होणार आहे. अवघ्या 15 दिवसांनी त्यांच्यासाठी डीए (DA) वाढीचा मार्ग मोकळा होणार आहे.
डीएशी संबंधित क्रमांक 31 जानेवारी 2023 रोजी येणार आहेत. 2023 च्या पहिल्या सहामाहीत त्यांच्या महागाई भत्त्यात किती वाढ होणार हे या आकड्यांवरून स्पष्ट होणार आहे . वास्तविक, AICPI निर्देशांकाचा डेटा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला येतो. डिसेंबर 2022 चा आकडा 31 जानेवारीला येणार आहे. हा अंतिम आकडा असणार आहे, ज्याआधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होईल..
महागाई भत्ता किती वाढणार ?
2023 च्या पहिल्या सहामाहीसाठी म्हणजेच जानेवारी ते जून 2023 साठीचा महागाई भत्ता (DA Hike) मार्च 2023 मध्ये जाहीर केला जाईल. पण, त्याचा अंतिम आकडा 31 जानेवारीपर्यंत येईल. वास्तविक, महागाई भत्ता AICPI निर्देशांकाच्या आधारे ठरवला जातो. निर्देशांकातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींची चलनवाढ लक्षात घेऊन कामगार मंत्रालय महागाई भत्ता वाढवते. आतापर्यंत नोव्हेंबर 2022 पर्यंतची आकडेवारी आली आहे. निर्देशांक क्रमांक 132.5 आहे.
अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात निश्चितपणे 3% वाढ होणार आहे. डिसेंबरमध्येही निर्देशांक स्थिर राहिल्यास त्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढेल. पण, जर डिसेंबरच्या आकड्यात 1 पॉइंटची वाढ असेल तर DA वाढ 4% देखील असू शकते. परंतु, त्याची शक्यता कमी दिसते.
AICPI निर्देशांकाचा आकडा का नाही वाढणार ?
तज्ञांच्या मते, डिसेंबरसाठी सीपीआय महागाईचे आकडे 12 जानेवारी रोजी आले आहेत. यामध्ये डिसेंबरमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 5.72% वर 1 वर्षाच्या नीचांकी पातळीवर आला आहे. त्याच वेळी, नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई 5.88% होती. नोव्हेंबरमध्ये किरकोळ चलनवाढ कमी झाली तेव्हा AICPI निर्देशांकातही कोणताही बदल झाला नाही.
AICPI निर्देशांक ऑक्टोबर 2022 मध्ये 132.5 अंकांवर होता, जो नोव्हेंबरमध्येही स्थिर राहिला. अशा परिस्थितीत डिसेंबर 2022 चा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकही स्थिर राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जरी निर्देशांकात थोडासा बदल झाला तरी डीएची वाढ केवळ 3% होईल असा अंदाज आहे.
किती होणार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA :-
डिसेंबर 2022 चा निर्देशांक स्थिर राहिल्यास, महागाई भत्ता 3% ने वाढणार..या संदर्भात, 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत एकूण महागाई भत्ता 41% पर्यंत पोहोचेल. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासून 38% महागाई भत्ता दिला जात आहे. जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18000 रुपये असेल तर त्याला दरमहा 6 हजार 840 रुपये DA मिळतो. परंतु, 3% DA वाढल्यास, DA – 41% पर्यंत पोहचेल अन् केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता 7 हजार 380 रुपये होईल. याचा अर्थ त्यांच्या महागाई भत्त्यात दरमहा एकूण 540 रुपयांची वाढ होणार आहे.
कधी जाहीर केला जाणार 2023 साठी महागाई भत्ता..
केंद्रीय कर्मचार्यांसाठी, 31 जानेवारीला जरी डीए किती वाढणार हे निश्चित होणार असलं तरी त्याची घोषणा मार्चमध्ये घोषणा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1 मार्च 2023 रोजी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत याला मंजुरी दिली जाईल. मार्चमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर 31 मार्चच्या पगारात DA वाढ केली जाईल. तसेच, त्यांना दोन महिन्यांची (जानेवारी आणि फेब्रुवारी) थकबाकीही मिळेल. कारण, जानेवारी 2023 पासून DA दरवाढ लागू होणार आहे.
फिटमेन्ट फॅक्टरमध्येही होणार मोठा बदल..
सरकार 2023 मध्ये कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करू शकते. याबाबत सरकार आणि संबंधित विभागांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. आता लवकरच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
सरकारने या मागणीचा विचार केल्यास कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेवटच्या वेळी जेव्हा फिटमेंट फॅक्टर वाढवला गेला तेव्हा कर्मचाऱ्यांचे किमान पगार थेट 6000 रुपयांवरून 18,000 रुपयांवर पोहचलं हॉट. दुसरीकडे, सरकारने त्यात पुन्हा एकदा वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपयांवरून थेट 26,000 रुपयांवर जाईल..