Take a fresh look at your lifestyle.

PM Kisan: 13 व्या हप्त्याची कन्फर्म डेट ठरली, या दिवशी 12 वा. करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रु. पहा तुमचं तुमचं नाव आहे का ?

0

देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच त्याच्या खात्यात 2000 रुपये येणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता जारी होणार आहे. येत्या 23 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवणार आहेत. हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस असल्याने कृषी विभागाकडून या तारखेवर शिक्कामोर्तब केलं गेलं आहे.

शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6 हजार रुपये दिले जातात. 4 महिन्यांच्या अंतराने ही रक्कम दोन हजार रुपयांच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.

PM Kisan : फक्त याचं शेतकऱ्यांना मिळणार पैसे :-

26 जानेवारीचा समारंभ हा 23 जानेवारीलाच सुरु होणार असून 23 तारखेला दुपारी 12 वाजता 26 जानेवारीला PM सन्मान निधीच्या 13 व्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर होणार आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी सकाळी 11 वाजता संवाद साधत स्वतः पात्र शेतकऱ्यांना ही भेट देणार आहेत. व्हर्च्युअल इव्हेंट दरम्यान रिमोट दाबताच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर केली जाईल. मात्र, अपात्र घोषित केलेल्या शेतकऱ्यांना तेराव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी (e-KYC) व्हेरिफिकेशन पूर्ण झाली आहे त्यांनाच पैसे दिले जाणार आहे.

PM Kisan : पोर्टलवर दिसणार तुमचं नावं..

पीएम किसानच्या 13व्या हप्त्यासाठी कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळतील याची अपडेट पीएम किसान पोर्टलवर अपलोड केली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी त्यांची नावे तपासावीत. जर तुमचे नाव नसेल तर तुम्ही ते दुरुस्त देखील करू शकता. अपूर्ण जमीन पडताळणी आणि ई-केवायसीमुळे तुमचे नाव यादीतून कापले जाऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत.

PM Kisan : मोबाईल नंबरद्वारे तुमचे स्टेटस तपासा..

13व्या हप्त्याचे पैसे मिळण्यापूर्वी, PM किसान योजनेतील लाभार्थी शेतकरी पोर्टलला भेट देऊन त्यांची स्थिती तपासू शकतात. स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. प्रधानमंत्री किसान योजनेत यापूर्वी मोबाईल किंवा आधार क्रमांकावरून स्टेटस जाणून घेता येत होतं. परंतु, नियमांमध्ये बदल केल्यानंतर, शेतकरी नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरूनच त्यांचे स्टेटस तपासू शकतात..

PM Kisan : अशा प्रकारे तुम्ही तुमचे स्टेटस तपासू शकता..

pmkisan.gov.in वर जा आणि उजव्या बाजूला असलेल्या छोट्या बॉक्समध्ये लिहिलेल्या Beneficiary Status वर क्लिक करा.

येथे एक स्वतंत्र पेज उघडेल. यामध्ये तुम्हाला तुमचा ‘नोंदणी क्रमांक’ भरावा लागेल. याद्वारे तुम्हाला तुमचं स्टेटस दिसेल.

जर तुम्हाला मोबाइल नंबरद्वारे स्टेटस तपासायचे असेल, तर ‘Search by Mobile number’ निवडा, त्यानंतर तुम्ही एंटर व्हॅल्यूमध्ये खात्याशी लिंक केलेला मोबाइल नंबर टाइप करा.

आता तुमच्या समोर इंटर इमेज टेक्स्ट दिसेल, ज्याच्या बॉक्समध्ये दिलेला इमेज कोड टाकावा लागेल आणि Get data वर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला तुमचे स्टेटस दिसेल..

Leave A Reply

Your email address will not be published.