Take a fresh look at your lifestyle.

MHADA Lottery 2023 : मुंबईत घर अन् तेही फक्त 17 लाखांत, 4721 घरांसाठी म्हाडाची लॉटरी, अर्जविक्रीला सुरुवात..

0

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या कोकण मंडळांतर्गत विकासकांच्या प्रकल्पातील 20% सर्वसमावेशक घरे अंतर्भूत करण्यात येणार असल्याने सध्या अंदाजे 5 हजार घरांची सोडतीची जाहिरात जानेवारीच्या उत्तरार्धात काढण्यात येणार आहे. मागील वर्षभरापासून कोकण मंडळातील घरांसह 20% खासगी विकासक व पंतप्रधान आवास योजनेतील घरांची चाचपणी केल्यानंतरच सोडत काढण्यात येणार आहे.

यापूर्वी म्हाडाने जून महिन्यात सोडत काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र घरांची संख्या, सोडतीचे सॉफ्टवेअर अद्ययावत करणे आणि राजकीय सत्तांतर यामुळे जून महिन्यात काढण्यात येणारी सोडत नव्या वर्षात काढण्याचा मुहूर्त म्हाडाला मिळाला आहे. यंदा पहिल्यांदाच नव्या अद्ययावत सॉफ्टवेअर प्रणालीमुळे केवळ नोंदणीकृत अर्जदारांची पात्रता निश्चिती प्राधान्याने करण्यात येणार असून पात्र उमेदवारांनाच सोडतीत सहभागी होता येणार आहे.

त्यामुळे सोडत पार पडल्यानंतर यशस्वी अर्जदाराला घराची ताबा प्रक्रिया पार पाडता येणार आहे. यापूर्वी सोडत पार पडल्यानंतर प्रथम सूचना पत्र मिळेपर्यंत 3 ते 4 महिन्यांचा कालावधी जात होता. यंदा मात्र घराचा ताबा तत्काळ देण्यासाठी नवी सॉफ्टवेअर प्रणाली कार्यरत राहणार आहे.

यंदा सोडतीचा अर्ज सादर करतानाच म्हाडा घरांसाठी आवश्यक ती कागदपत्रे ऑनलाइन सादर करावी लागणार आहेत. म्हाडा कोकण मंडळांच्या घरांच्या सोडतीत शिरढोण, पालघर येथील पंतप्रीतून आवास योजनेतील घरांसह कोकण मंडळाच्या विरार येथील अंदाजे 5 हजार घरांची सोडत जानेवारी महिन्याच्या अखेरीस काढण्यात येणार आहे.

या घरांमध्ये विहंग समूहातील 250, तर ठाणे महानगरपालिकेकडून 300 घरांची व पंतप्रधान आवास योजनेतील 550 घरांची उपलब्धता करण्यात आली आहे. म्हाडाने स्वतःच्या भूखंडावर तसेच सहकारी, खासगी भागीदारी तत्त्वावर अर्थात पीपीपी अंतर्गत प्रकल्प सुरू आहेत.

यामध्ये पीपीपी वगळता 28 हजार 737 अत्यल्प व 88 अल्प घरांचे काम वेगाने सुरू आहे. येत्या काळात या घरांची सोडत निघण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून 44 हजार घरांची उभारणी असून बहुतांशी प्रकल्पांत गृहखरेदीदारांना डायरेक्ट क्रेडिट लिंक सबसिडी देण्यात येत आहे.

यापूर्वी म्हाडाच्या माध्यमातून पीएमएवाय योजनेंतर्गत भंडार्ली, गोठेघर या विभागातील घरांसाठी 100% प्रतिसाद मिळाला असून येत्या काळात शिरढोण, पालघर येथील घरांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पीएमएवाय योजनेसह कोकण मंडळातर्गत वसई – विरार, मीरा भाईंदर, ठाणे येथील घरांचाही समावेश करण्यात येणार आहे.

MHADA Lottery 2023 : अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा

जानेवारी 2023 मध्ये सोडत काढण्याचे नियोजन म्हाडा कोकण मंडळाकडून करण्यात येत आहे. म्हाडा कोकण मंडळाच्या माध्यमातून 14 ऑक्टोबर 2021 रोजी 8984 घरांची सोडत काढण्यात आली होती. मेट्रो सेवा, कार्यालयीन व निवासी क्षेत्राचा विस्तार, पायाभूत सुविधांचा विकास यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातही सर्वसामान्य अधिक प्रतिसाद देत असल्यानेच जवळपास 2 लाख 46 हजार अर्जदारांनी घरासाठी अज दाखल केले होते.

फक्त 17 ते 20 लाखांत मिळणार घरे..

कोकण मंडळाने म्हाडाच्या घरांसाठी तब्बल 4000 घरांसाठी सोडत काढण्याची तयारी केली होती. परंतु, पीएम योजनेमधील 550 नवीन घरे म्हाडाला मिळाली आहे. त्यामुळे आता घरांची संख्या वाढली आहे. ही वाढीव घरे अल्प गटासाठी असून अंदाजे 300 चौरस फुटांची आहेत. त्याची किंमती 20 लाख रुपयांपर्यंत आहे.

यासह विरार महानगरपालिकेकडून पंतप्रधान आवास योजनेतील अंदाजे 300 घरे म्हाडाला प्राप्त झाली आहेत. ती अत्यल्प गटासाठी असून या घरांचे क्षेत्रफळ अंदाजे 300 चौरस फूट आहे. घरांची अंदाजित किंमत 17 लाख रुपयांच्या घरात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.