Take a fresh look at your lifestyle.

Gold Rate : महिनाभरात सोनं 60 हजारी तर चांदीही 75 हजारी टप्पा ओलांडणार? जाणकारांचा अंदाज, सध्या मार्केटमध्ये रेकॉर्डब्रेक दर, पहा..

0

सध्या पौष महिन्यात विवाहाच्या तारखा नसूनही सोन्याच्या दरात चांगलीच वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या घडामोडींमुळे सोन्याचे दर वाढत असल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे. आगामी काळात सोने 60 हजारांवर जाण्याची शक्यता आहे, तर चांदी पाऊण लाखांवर जाऊ शकते.

जागतिक बाजारपेठेत गुंतवणुकीसाठी सोने खरेदी वाढल्यामुळे सोन्याचे दर वाढत आहेत. नववर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या, चांदीच्या दरात चढ उतार होत आहेत. नाशिकमध्ये आठवड्याच्या शेवटी शनिवारी सोने दर प्रतितोळा 56 हजार 500 हजार रुपयांवर पोहोचले. चांदी प्रतिकिलो दर उच्चांकी 70 हजारांवर गेले आहेत.

पुढील आठवड्यात किंवा जानेवारी अखेरपर्यंत सोने 60 हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. आठवडाभरापासून सोने व चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोने गेल्या दोन अडीच वर्षांतील उच्चांकी दरावर आहे.

31 डिसेंबर 2022 रोजी 150 रुपयांची वाढ होऊन सोने दर प्रतितोळा 55 हजार 500 रुपयांवर गेले होते. यानंतर 1 आणि 2 जानेवारी रोजी दर 54,500 व 54,900 रुपयांपर्यंत खाली आले.

4 जानेवारीला सोन्याचे दर प्रतितोळा 55,400 रुपये होते, तर 7 जानेवारीला सोने 55 हजार 800 रुपयांवर गेले. आता सातत्याने सोन्याच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे सोने पुन्हा 57 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वाढलेले सोन्याचे दर तसेच पौष महिन्यात विवाहाचे मुहूर्त नसल्यामुळे विवाह सोहळेसुद्धा अतिशय मोजकेच होत आहेत. विवाह किंवा मुंजीचे मुहूर्त नसतानाही सोन्याचे दर वाढत असल्यामुळे सर्वसामान्या नागरिकांमध्ये काळजीचे वातावरण आहे.

आगामी काळात होणाऱ्या विवाह समारंभासाठी जादा दराने सोने खरेदी करण्याची वेळ वर- वधू पित्यांवर येणार आहे. कोरोना काळाआधी चांदी 75 हजारांवर गेली होती. आताही चांदीचा दर 70 हजार रुपये किलो आहे. त्यामुळे सोन्यासह चांदीचाही भाव वधारणार आहे.

भाववाढीमागं नेमकं कारण काय ? पहा काय म्हणाले, सराफ असोशियनचे अध्यक्ष – गिरीश नवाशे (नाशिक)

रशिया युक्रेन युद्धाची वाढती तीव्रता, चीनमधील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, अमेरिकेसह युरोपातील वाढती महागाई आणि परिणामी मध्यवर्ती बँकांकडून वाढणारे व्याजदर यांच्यामुळे जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांकडून सरलेल्या वर्षांत सोन्यातील गुंतवणुकीला अधिक पसंती राहिली.

सध्याची एकंदर जागतिक परिस्थिती पाहता सोने 2023 मध्ये दुहेरी परतावा देईल असा अंदाज आहे. वाढणाऱ्या जागतिक मागणीचे पडसाद सोन्याच्या दरावर उमटले आहेत. त्याच जोडीला डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरत असल्याने भारतातदेखील सोन्याचे भाव वाढले आहेत. विवाह हंगामावर आता सोन्याचे दर अवलंबून राहिलेले नाही. जागतिक घडामोडींवर आता सोन्याचे दर कमी जास्त होत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.