भोगवटादार वर्ग-2 चे रूपांतरण भोगवटादार वर्ग-1 (NA) मध्ये करा फक्त 2 दिवसांत..! ही आहे सर्वात सोपी कार्यपद्धती..

0

शासनामार्फत भोगवटादार वर्ग – 2 किंवा नवीन व अविभाज्य शर्तीने दिलेल्या अनेक जमिनी आहेत शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी शासनाने अशा जमिनींच्या हस्तांतरणाबाबत वेळोवेळी सुधारणा केलेल्या आहेत. त्यातील काही संभ्रम दूर होतील ही अपेक्षा आहे. महत्वाच्या सुधारणा एकत्रित करून हा लेख तयार केला आहे. महत्वाच्या सुधारणा एकत्रित वाचल्यामुळे अनेक संभ्रम दूर होतील ही अपेक्षा आहे.

उपरोक्त शासन परिपत्रकाची तरतुद फक्त नवीन व अविभाज्य शर्तीने दिलेल्या भोगवटादार वर्ग – 2 च्या इनामी आणि वतनी जमिनींनाच लागू असेल. महार वतनी जमीनी, कुळ कायदा कलम 43 च्या नवीन शर्तीवरील जमीनी, वाटप केलेल्या नवीन शर्तीवरील शासकीय जमीनी, कुळ कायदा कलम 84 क अन्वये वाटप केलेल्या नवीन शर्तीवरील जमीनी, सिलींग कायद्याखाली वाटप केलेल्या नवीन शर्तीवरील जमिनींना ही तरतुद लागू होणार नाही.

(1) नवीन व अविभाज्य शर्तीने धारण केलेल्या ‘भोगवटादार वर्ग -2’ च्या इनामी किंवा वतनी जमिनींची शेतीच्या प्रयोजनासाठी विक्री करण्यासाठी कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. परंतु अशा विक्रीनंतर ‘भोगवटादार वर्ग -2’ आणि नवीन व अविभाज्य शर्तीने हा शेरा सात – बारावरून कमी होणार नाही.

(2) जमिनीवरील ‘भोगवटादार वर्ग – 2 आणि नवीन व अविभाज्य शर्तीने हा शेरा कमी करुन त्या भोगवटादार वर्ग -1’ मध्ये (जुन्या शर्तीने) तबदील करण्यासाठी सदर जमिनीच्या चालू बाजारभावाच्या किंमतीच्या 50% नजराणा रक्कम संबंधीताने चलनाव्दारे शासकीय कोषागारात जमा करावी लागेल.

( 3) जर यापूर्वीच अशा ‘भोगवटादार वर्ग -2’ आणि ‘ नवीन व अविभाज्य शर्तीने असलेल्या जमिनींचा अकृषीक (NA) वापर करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी, योग्य ती रक्कम शासकीय कोषागारात जमा करून घेण्यात आली असेल तर अशा ‘भोगवटादार वर्ग -2’ च्या जमीनी ‘पूर्वलक्षी प्रभावाने’ भोगवटादार वर्ग -1 ‘ च्या संबोधण्यात येतील.

(4 ) जर कोणी अशा ‘ भोगवटादार वर्ग -2 च्या जमीनीची 50% नजराणा रक्कम न भरता, अकृषीक (NA) वापर करण्यासाठी विक्री केली असेल तर त्याला चालू बाजारभावाच्या किमतीच्या 50% नजराणा रक्कम आणि नजराणा रकमेच्या 50% दंड भरुन अशी जमीन ‘भोगवटादार वर्ग -1’ मध्ये तबदील करून घेता येईल.

कशी राबवली जाते कार्यपद्धती :-

* जर कोणत्याही शेतकऱ्याची ‘भोगवटादार वर्ग -2 ‘आणि ‘ नवीन व अविभाज्य शर्तीने हा शेरा कमी करुन त्याची जमीन ‘भोगवटादार वर्ग -1’ मध्ये (जुन्या शर्तीने ) तबदील करुन विक्री करण्याची इच्छा असेल तर त्याने संबंधीत तहसिल कार्यालयात योग्य त्या कागदपत्रांसह, तसा लेखी अर्ज सादर करावा.

* असा अर्ज मिळाल्यानंतर दोन दिवसात तहसिल कार्यालय, अर्जदारास त्या जमिनीच्या चालू बाजारभावाच्या किंमतीच्या 50% नजराणा रकमेचे लेखाशिर्ष नमूद असलेले चलन तयार करुन देईल आणि संबंधीताने ही 50% नजराणा रक्कम, चलनाव्दारे शासकीय कोषागारात जमा केल्यानंतर ते चलन तसेच खरेदीची कागदपत्रे पाहून तलाठी त्या व्यवहाराची नोंद गाव नमुना नं. 6 मध्ये घेईल.

* मंडल अधिकारी, ते रक्कम जमा केल्याचे चलन तपासून ‘भोगवटादार वर्ग -2 आणि नवीन व अविभाज्य शर्तीने हा शेरा कमी करण्याचा आदेश देतील आणि सदर जमीन भोगवटादार वर्ग -1 मध्ये तबदील होईल उपरोक्त चलनाशिवाय इतर कोणत्याही आदेशाची आता आवश्यकता असणार नाही.

आवश्यक कागदपत्रे :-

1. जमीन मालक यांनी करावयाचा विनंती अर्ज (जो आपण खाली PDF स्वरूपात दिला आहे)
2. जमिनीचे 50 वर्षाचे उतारे व खाते उतारा
3. विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र
4. 7/12 उतारा मधील सर्व फेरफार नोंदी
5. आकरबंदाची मूळ प्रत
6. एकत्रीकरणाचा मूळ उतारा
7. मूळ धारकास जमीन कशी मिळाली त्याबाबत कबुलायत
8. तलाठी यांच्याकडील वन जमीन नोंद वहीचा उतारा

भोगवटादार वर्ग- 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी :- PDF अर्ज

Leave A Reply

Your email address will not be published.