गावठाणापासून 200 मीटर परिघातील जमीन NA होणार, 1 एकर, 1 हेक्टर जमीन NA करण्यासाठी किती येईल खर्च ? पहा PDF फॉर्म अन् प्रोसेस..

0

सध्या राज्यात शहरांलगत सगळीकडं औद्योगिक क्रान्ती, शहरीकरण झालेल्या आजूबाजूंच्या गावांत जमिनीला खूप मोठं महत्व प्राप्त झालं आहे. यामुळे शेतकरी आपली जमीन अकृषिक (NA) प्लॉटिंग करण्याच्या विचारात आहे. परंतु जमीन NA करणं इतकं सोपं नसतं. ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असते. 

तसेच शेतकऱ्यांना एखादी जमीन अकृषिक करायचं म्हंटल तर किचकट कागदपत्रे गोळा करणे, वेगवेगळ्या विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे, स्टॅम्प पेपरवर घोषणापत्र देणे अशा अनेक गोष्टींसाठी खूप वेळ लागायचा.ही NA प्रक्रिया आणखी सुलभ व्हावी म्हणून शासन स्तरावर प्रयत्नही केले जात आहे.

परंतु आता अशा शेतकऱ्यांसाठी – जमीनदारांसाठी एक दिलासादायक अन् महत्वपूर्ण अपडेट आलं आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी एक आवाहन केलं असून त्यांनी सांगितलं आहे की, गावच्या गावठाण पासून 200 मीटरच्या परिघातील आणि अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये विकासयोग्य झोनकरिता वाटप केलेल्या क्षेत्रातील कोणतीही जमीन देय रक्कम शासन जमा करून जमीन अकृषिक करून घेण्याचे निर्देश तहसीलदारांनी दिले आहेत. यामुळे आता गावठाण पासून 200 मीटरच्या अंतरावरील जमीन ही अकृषिक (NA) होणार आहे.

यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक ती रक्कम भरावी लागणार आहे. तसेच जमीन अकृषिक (NA) करण्यासाठी इतर कागदपत्रांची पूर्तता करण्याची देखील आवश्यकता भासणार नाहीये.

शेतकरी – जमीनदारांच्या सुविधेसाठी ही प्रक्रिया मोहीम स्तरावर राबविण्यात येणार असल्याने नागरिकांना या क्षेत्रात घर बांधणे किंवा इतर प्रयोजनासाठी नियमानुसार जमिनीचा उपयोग करणे शक्य होणार आहे अन् फक्त 60 दिवसातच ही जमीन अकृषिक (NA) होणार आहे.

त्याची प्रक्रिया म्हणजे भोगवटादार ज्या दिवशी आवश्यक तेवढी रक्कम भरेल त्या रक्कम भरल्याच्या दिनांकापासून साठ दिवसांच्या कालावधीत विहीत केलेल्या नमुन्यात सनद देण्यात येईल व त्यानुसार सदरची जमीन अकृषिक झाल्याचे समजण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ अधिकाधिक जमीन धारक व मिळकतधारकांनी घ्यावा आणि तहसिलदारांकडे अर्ज करून जमीन अकृषिक करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

भोगवटादार वर्ग-2 धाराची जमीन असल्यास अशा जमिनीच्या मानीय अकृषिक रूपांतरणापोटी देय नजराणा किंवा अधिमूल्य आणि इतर शासकीय देणी भरून सदरची जमीन महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील तरतूदीनुसार अकृषिक वापरात रूपांतरीत झाल्याचे समजण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केलं आहे, त्यामुळे भोगवटादार वर्ग-2 च्या जमीनधारकांनाही आपल्या जमिनी अकृषिक (NA) करता येणार आहे.

भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनी भोगवटादार वर्ग- 1 मध्ये किंवा (NA) रूपांतरित करण्यासाठी :- इथे क्लिक करा

कोणत्या शेत – जमिनींचे केले जाते NA मध्ये रूपांतरण..

निवासी, व्यावसायिक वैयक्तिक, औद्योगिक क्षेत्र पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि संवर्धन हेतूंसाठी तसेच सार्वजनिक किंवा अर्ध – सार्वजनिक सेवा समुदाय, जमाती समारंभाच्या उद्देशाने राज्य किंवा जिल्ह्यासाठी सार्वजनिक उपयोगिता करता NA मध्ये रूपांतरण केलं जाऊ शकतं.

किती भरावा लागणार कर.. आपण उदाहरानुसार जाणून घेऊ…

समजा तुम्हाला 0.10 हेक्टरसाठी अकृषिक वापराचा परवाना घ्यायचा असून तुम्ही भोगवटादार वर्ग- 1 खातेदार आहात..

आता यामध्ये महसूल कायदयातील तरतुदीनुसार, वर्ग 1 मधील गावांसाठी प्रचलित अकृषीक आकारणीचा दर 0.10 पैसे प्रति चौ. मीटर तर वर्ग 2 गावासाठी 0.05 प्रति चौ. मीटर असा आहे.

आता या बाबत अकृषिक (NA) आकारणीचे कॅल्क्युलेशन केलं तर..

0.10 Ha‌ = 1000 चौरस मीटर

1000 चौरस मिटर अकृषिक आकारणीचा दर 0.10 पैसे = 100 रुपये इतका होईल

आकार + स्‍थानिक उपकर = वार्षिक आकारणी यामध्ये ऐन + सातपट जि.प. उपकर + ऐन = ग्रा.प.उपकर होतो.

रु. 1000 + रु.700 + रु. 100 = रु. 900 वार्षिक आकारणी

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 47 अ नुसार परिवर्तन कर / रुपांतरण कर हा आकारणीच्‍या पाचपटी पर्यंत आकाराला जातो अर्थात रु. 100 x 5 = रु. 500 इतका हा कर होईल.

यानुसार आपनास 0.10 हे. आर अर्थात 1000 चौरस मीटरसाठी क्षेत्रासाठी एकूण रु. 900 वार्षीक आकारणी + रु. 500 परिर्वतन कर / रुपांतरण कर अशे एकूण रु. 1400 कर स्वरूपात निश्चित करण्‍यात येतील.

हा कर याचबरोबर इतर काही सरकारी बाकी किंव्हा कर असतील तर ते कर भरून त्याची पावती विहित नमुन्यातील अर्ज सोबत सादर केल्यास आपणास तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून एक सनद दिली जाईल..

अर्ज करण्यासाठी आपल्याकडे PDF स्वरूपात फॉर्म ही उपलब्ध आहे. तो डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

अर्ज नमुना PDF डाउनलोड करा  

तसेच तुम्हाला कमी वेळात अन् अधिक गुंतागुंतीत न पडत आपली शेतजमीन अकृषिक (NA) करायची असेल तर तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांनी भेटावे..

तसेच तुम्ही अधिक माहितीसाठी शासनाचा हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966 चा कायदा पहा :- इथे करा क्लिक

Leave A Reply

Your email address will not be published.