भारतात गाय – म्हैस पालनाकडे लोकांचा कल वाढला आहे. शेतीचा खर्च कमी करायचा असेल किंवा दूध विकून जास्तीचे उत्पन्न मिळवायचे असेल तर या सर्व कामात गाय अत्यंत उपयुक्त ठरत आहे. देशी गाईचे दूध आणि तूपही आरोग्यासाठी खूप चांगलं आहे.
जरी सर्व देशी गायींची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत, परंतु आज आपण त्या देशी गायीबद्दल बोलणार आहोत, जिला पहाडांची कामधेनूचा दर्जा दिला आहे. या गायीच्या दुधात सामान्य गाईच्या दुधापेक्षा जास्त पोषण असते. त्यामुळे या गायीच्या दुधापासून बनवलेले तूप बाजारात 5,500 रुपये किलोने विकलं जात आहे. लहान शेतकऱ्यांचा मसिहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बद्री गायीबद्दल आपण जाणून घेणार आहोत..
किती दूध देते बद्री गाय..
‘बद्री’ ही गायीची देशी जात आहे, जी उत्तराखंडमध्ये आढळते. तसे पाहता बद्री गाय इतर गायींच्या तुलनेत केवळ 3 ते 4 लिटर दूध देते, मात्र तिच्या दुधापासून बनवलेले तूप 5,500 रुपये किलोने विकलं जात आहे. म्हणजे इतर गाईच्या तुलनेत 10 पट जास्त..
या गायीपासून दुधाचे उत्पादन कमी होतं, त्यामुळे आता लोकांना ती पाळणे आवडत नाही. दुग्धव्यवसायाच्या व्यावसायीकरणानंतर बद्री गाय नामशेष होत चालली आहे, परंतु अनेक डेअरी फार्मने बद्री गाईच्या दुधाची गुणवत्ता समजून घेतली आहे, आता ते या गाईच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करत आहेत.
ही जात वाचवण्यासाठी नारियाळगाव पशुसंवर्धन केंद्राच्या मोहिमेला यश आलं असून आता या जातीच्या 140 गायी तेथे उपस्थित आहेत. प्रजनन केंद्र करची (जोशीमठ), प्रजनन केंद्र साळना (जोशीमठ) येथे 300 बद्री गायी आहे असून आता या गाईंच्या उत्पत्तीवर लक्ष देणार आहे.
बद्री गाईचे तूप एवढं महाग का ?
बद्री गाय डोंगराळ किंवा थंड प्रदेशासाठी सर्वात योग्य मानली जाते. बद्री गायीच्या दुधात अजिबात भेसळ नसते हे अनेक संशोधनातून सिद्ध झालं आहे. तिच्या दुधात 8.4% फॅट असतं, जे कोणत्याही गाय आणि म्हशीच्या दुधापेक्षा जास्त आहे.
बद्री गाईच्या दुधात टोटल सॉलिड 9.02% आणि क्रूड प्रोटीन 3.26% आहे. बद्री गाईच्या दुधात केवळ ए-2 प्रोटीन असून अनेक पोषक घटकही असतात. त्यामुळे तिच्या दुधापासून बनवलेले ताक, लोणी, तूपापर्यंत जवळपास सर्वच दुग्धजन्य पदार्थ महाग आहेत.
नामशेष होत चालली आहे बद्री गाय
देशात दूध-दुग्ध व्यवसायाकडे आता व्यवसाय म्हणून पाहिलं जातं. दुग्ध उत्पादक शेतकरी त्या जातींवर अधिक लक्ष केंद्रित करतात, जे जास्त प्रमाणात दूध देतात. याउलट बद्री गायीच्या दुधाचा दर्जा चांगला असला तरी ती एका दिवसात केवळ 4 किलो दूध देते, त्यामुळे त्यांची संख्या कमी होत चालली आहे.
या गायीच्या संवर्धनासाठी उत्तराखंडमधील चंपावत येथील नरियाल गावातील पशुसंवर्धन केंद्रात काम सुरू आहे. येथील स्थानिक लोकांसाठी बद्री गाय हळूहळू उत्पन्नाचे साधन बनत आहे.
बद्री गाईचे दूध लोकदेवताला केलं जातं अर्पण..
बद्री गाय ही अत्यंत कमी किमतीची गोवंशीय प्रजाती आहे, जी हिमालयातील बुग्यालमध्ये चरूनच दूध देते. बुग्यालमध्ये पोषणाची खाण असल्याचे मानले जाते. म्हणूनच बद्री गाईच्या दुधात भेसळ नाही, फक्त पोषण आहे. या गायीचे दूध इतके पवित्र आहे की तिचे दूध येथील स्थानिक देवतेला अर्पण केलं जातं.
लोक म्हणतात की, बद्री गाय हीच खरी गौडण मानली जाते. आज बद्री गाईचे तूप विकून अनेक ऑनलाइन कंपन्या आपले अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्तराखंड डेअरी विभाग आणि UKCDP देखील बद्री गायीच्या संरक्षणासाठी सतत प्रयत्न करत आहेत.