केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एक Good News, महागाई भत्त्यात जबरदस्त वाढ, थेट 51% पोहचणार, पहा नवं अपडेट..

0

5 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या अन् 3 डिसेंबरला 4 राज्यांचे निकाल जाहीर झाले असून मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्यात भाजपने प्रचंड मोठा विजय मिळवला आहे. अशातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक नवं अपडेट समोर आलं आहे. जानेवारी 2024 च्या महागाई भत्त्यात वाढीचा नवा आकडा समोर आला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 49 टक्क्यांवर पोहोचला आहे. AICPI निर्देशांकाच्या ताज्या आकडेवारीत, निर्देशांक क्रमांक 138.4 अंकांवर पोहोचला आहे. यामध्ये 0.9 अंकांची झेप दिसून आली आहे. ऑक्टोबर महिन्याची ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्ता सुधारला जाणार आहे. याचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी वापरलेले नंबर्स हे ठरवतील की महागाई भत्त्यात किती वाढ होईल. नोव्हेंबर आणि डिसेंबरची आकडेवारी येणे अजून बाकी आहे..

किती वाढू शकतो महागाई भत्ता ?

महागाई भत्त्यात आतापर्यंतची सर्वात मोठी 5 टक्के वाढ होऊ शकते. AICPI निर्देशांकाने निर्धारित केलेला डीए स्कोअर असेच काहीतरी सूचित करतो. सध्याच्या ट्रेंडनुसार, महागाई भत्ता 51 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. असे झाल्यास 5 टक्क्यांची मोठी वाढ होईल. AICPI निर्देशांकावरून महागाई भत्ता मोजला जातो. निर्देशांकातील विविध क्षेत्रांमधून गोळा केलेल्या महागाईच्या आकडेवारीवरून कर्मचाऱ्यांचा भत्ता महागाईच्या तुलनेत किती वाढला पाहिजे हे दर्शविते..

4 महिन्यांच्या डेटामध्ये 3 टक्क्यांनी वाढला DA

जर आपण सद्यस्थितीवर नजर टाकली तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरसाठी AICPI निर्देशांक जारी करण्यात आले आहेत. सध्या निर्देशांक 138.4 अंकांवर आहे, तर महागाई भत्ता स्कोअर 49.08 टक्क्यांवर पोहोचला आहे. नोव्हेंबरमध्ये हा आकडा 50 टक्क्यांच्या पुढे जाईल असा अंदाज आहे. यानंतर डिसेंबरमध्येही तो 0.54 अंकांच्या उसळीसह 51 टक्क्यांच्या जवळ दिसू शकतो. डिसेंबर 2023 चे AICPI निर्देशांक आल्यानंतरच, एकूण महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे अंतिम ठरणार आहे.

महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ..

7 व्या वेतन आयोगांतर्गत, AICPI नंबर्स जुलै ते डिसेंबर 2023 पर्यंत केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता ठरवतील. महागाई भत्ता सुमारे 49.08 टक्क्यांवर पोहोचला आहे. 2 महिन्यांचे आकडे येणे बाकी आहेत. त्यात 3 टक्क्यांनी वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जर आपण कल पाहिला तर, सुमारे 1.60 टक्के वाढ अद्याप होऊ शकते. असे झाल्यास महागाई भत्ता 50.60 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. अशा स्थितीत, दशांश बिंदूच्या वरचा आकडा 51 टक्के मानला जाईल. महागाई भत्ता कॅल्क्युलेटर उर्वरित महिन्यांत महागाई भत्ता 51 टक्क्यांपर्यंत पोहोचेल असे संकेत देत आहे.

खाली दिलेला चार्ट लक्ष देऊन पहा तुम्हाला आयडिया येईल..

 महिना /वर्षे CPI(IW) BY2016=100 DA% मासिक वाढ
जानेवारी 2023 132.8
फेब्रुवारी 2023 132.7
मार्च 2023 133.3
एप्रिल 2023 134.2
मे 2023 134.7
जून 2023 136.4
जुलै 2023 139.7
ऑगस्ट 2023 139.2
सप्टेंबर 2023 137.5
ऑक्टोबर 2023
नोव्हेंबर 2023
डिसेंबर 2023
Leave A Reply

Your email address will not be published.