Take a fresh look at your lifestyle.

DA Hike : कर्मचार्‍यांना बंपर फायदा! ₹ 56,900 च्या बेसिक सॅलरीवर DA दरमहा 26,174 रुपये खात्यात जमा होणार, जाणून घ्या कॅल्क्युलेशन..

0

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येणारा महिना चांगला जाणार आहे. नोव्हेंबरपासून त्यांचा खिसा पैशांनी भरला जाणार आहे.सुधारित महागाई भत्ता ऑक्टोबरच्या पगारात जोडून दिला जाऊ शकतो. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात महागाई भत्त्यात वाढ मंजूर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत त्याच्या पगारात मोठी वाढ आहे.

पगारात होणार बंपर वाढ..

केंद्रीय कर्मचारी जुलै 2023 च्या महागाई भत्त्यात (DA Hike) वाढ होण्याची वाट पाहत आहेत. येत्या काही दिवसांत DA मध्ये 4 टक्के वाढ होणार हे जवळपास निश्चित आहे. DA वाढल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होणार आहे. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता. परंतु, त्यात 4 टक्के अधिक जोडल्यास डीए 46 टक्के होणार असून त्याचबरोबर तीन महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे..

DA मध्ये 4% वाढ झाल्यास पगारात किती होणार वाढ..

DA 4% ने वाढवल्यानंतर कर्मचार्‍यांचा पगार वेगवेगळ्या श्रेणीनुसार वाढेल. महागाई भत्ता मूळ वेतनानुसार मोजला जातो. सध्याच्या 42 टक्क्यांवरून महागाई भत्ता (DA)आणि महागाई सवलत (DR) उपलब्ध आहे. डीए वाढल्याने पगारही थेट वाढतो. मात्र, डीएमध्ये थेट 4 टक्के वाढ केल्यास किती पैसे मिळतील ? आपण ते कॅल्क्युलेशनने समजून घेउया..

56,900 हजारांच्या बेसिक सॅलरीवर किती वाढणार पैसा ?

जुलै 2023 साठी महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. जूनपर्यंत AICPI निर्देशांक 136.4 वर पोहोचला आहे. त्याच्या गणनेच्या आधारे, डीएमध्ये एकूण वाढ 4% वाढ असल्याचे मानले जाते. डीए वाढून 46 टक्के होईल. आता जर आपण 56,900 रुपयांच्या बेसिकवर DA काढला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यातील पगारासह एकूण महागाई भत्ता 26,174 रुपये होईल. 56,900*46/100 = 26,174 रुपये.

वार्षिक आधारावर पाहिले तर ते रु. 26,174*12 = रु. 314,088 होते. परंतु, दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता सुधारित केला जातो. त्यामुळे ही वार्षिक गणना केवळ अंदाजासाठी करण्यात आली आहे.

1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार लाभ..

50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात 4 टक्क्यांहून अधिक वाढीचा फायदा होणार आहे. त्याची अंमलबजावणी 1 जुलै 2023 पासून होणार आहे. ऑक्टोबर अखेर त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरची DA थकबाकी देखील खात्यावर जमा होणार आहे. यापूर्वी मार्च 2023 मध्येही महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती..

जुलै ते डिसेंबर दरम्यान किती होणार फायदा ?

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलैमध्ये बहाल करण्यात आला. अशा परिस्थितीत, जर जुलैच्या आधी DA वर कॅल्क्युलेशन केलं तर ..

कर्मचार्‍यांचे मूळ वेतन – रु. 18000 (किमान मूळ वेतन)
महागाई भत्ता 46 टक्के (अंदाजे वाढ) – रु. 8280
महागाई भत्ता 42% (जुलैपूर्वी) – रु 7560
एकूण डीएमध्ये वाढ – 8280-7560 = रु. 720
वार्षिक पगार वाढ – 720X12 = रु. 8,640

(जुलै 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंत केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात 720 रुपयांची वाढ होणार आहे. परंतु, हे किमान पगाराच्या आधारावर आहे. वेगवेगळ्या पे – बँडवर DA वर कॅल्क्युलेशन वेगळं असेल.)

Leave A Reply

Your email address will not be published.