देशातला सर्वात लांब दुहेरी बोगदा महाराष्ट्रात! 12Km साठी तब्बल 16,000 कोटींचा खर्च, 2 तासांचा प्रवास थेट 15 मिनिटांवर..

0

भारतातील पहिला वहिला सर्वात मोठा जमिनीखालील बोगदा महाराष्ट्रातील 2 शहरांना जोडण्याकरता तयार होणार आहे. घोडबंदर रोडची वाहतूक समस्या सोडविणारा प्रोजेक्ट वनविभागाकडून मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. या प्रोजक्टसाठी कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया मे महिन्यातच पूर्ण झाली होती, मात्र मंजुरी न मिळाल्याने ठाणे – बोरिवली ट्विन टनलच्या कामास विलंब झाला होता. सुमारे 12 किमी असलेल्या या प्रोजेक्टसाठी तब्बल 16 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. निविदेतील अटींनुसार कंपनीला तीन वर्षांत काम पूर्ण करायचे आहे.

ठाणे – बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार होते, मात्र वनविभागाकडून ग्रीन सिग्नल न मिळाल्याने सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये सुरू होणारा हा प्रकल्प अद्याप सुरू होऊ शकला नाही. आता पावसाळा संपल्याने 15 दिवसातच या प्रकल्पाचे बांधकाम सुरु होणार असल्याचं MMR च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

कसा आहे हा प्रोजेक्ट..

ठाणे-बोरिवली ट्विन बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधून जाणार आहे. तेथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम सुरू करण्यासाठी MMRDAला वनविभागाची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. नॅशनल पार्क अंतर्गत प्रत्येकी 3 लेनचे दोन बोगदे बांधले जाणार आहे. बोरिवली ते ठाणे दरम्यान सुमारे 5.75 किमी लांबीचा बोगदा आणि ठाणे ते बोरिवली दरम्यान सुमारे 6.1 किमी लांबीचा बोगदा असणार आहे. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर ठाण्यातून बोरिवलीला अवघ्या 15 ते 20 मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. तर 10.5 लाख मेट्रिक टन इंधनाची बचत होणार आहे. कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनात 36 टक्के घट होण्यासही योगदान लाभणार आहे. सध्या हा प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास दीड ते दोन तास लागतात.

प्रत्येकी 3 लेन असलेले बोगदे 4 मेगा टनेल बोरिंग मशीन (TBM) वापरून जमिनीखाली जास्तीत जास्त 23 मीटर खोलीवर बांधले जाणार असून बोरिवलीतील मागाठाणेचे एकता नगर आणि ठाण्यातील मानपाडा येथील टिकुजी – नी – वाडी यांना जोडले जाणार आहे.

बांधकामाची तयारी झाली पूर्ण..

बोगदा बांधण्याची जबाबदारी मेघा इंजिनीअरिंग कंपनीकडे देण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार प्रकल्पाच्या आरएमसी प्लांटसाठी बोरिवलीजवळील जमीन निवडण्यात आली आहे. मुंबईत 2 टनेल बोअरिंग मशीन आणण्याची तयारी सुरू आहे. संबंधित विभागाकडून परवानगी मिळताच दहा ते पंधरा दिवसांत बांधकाम सुरू करण्यात येणार आहे.

प्रोजेक्टचा काय होणार फायदा..

घोडबंदर रोडमुळे मुंबई शहर हे गुजरात राज्याला जोडलं आहे. गेल्या काही वर्षांत येथे झपाट्याने विकास झाला आहे, मोठ्या प्रमाणात इमारतीचं जाळं या भागांत बांधलं जात आहे. लोकसंख्या वाढल्याने येथील वाहनांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे घोडबंदर रोडची वाहतूक समस्या अनेक पटींनी वाढली आहे. ठाणे ते बोरिवली हा नवीन मार्ग तयार झाल्याने घोडबंदर रोडची वाहतूक समस्या बऱ्याच अंशी कमी होईल अशी अपेक्षा आहे.

ठाणे ते बोरिवली ट्विन टनेल प्रोजेक्टबाबत 7 गोष्टी..

दोन्ही बोगद्यांसाठी या वर्षी 14 जानेवारी रोजी निविदा काढण्यात आल्या होत्या आणि निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 4 एप्रिल निश्चित करण्यात आली होती.

– बोगदा पूर्ण होण्याची अपेक्षित तारीख निविदेच्या तारखेपासून साडेतीन वर्षे आहे.

– प्रकल्पाची अंदाजे किंमत 16,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि सुविधांमुळे ठाणे ते बोरिवली दरम्यानचा प्रवास वेळ कमी होईल, तसेच ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी होईल..

-11.8 किमी लांबीचा हा मार्ग ठाण्यातील टिकुजी – नी – वाडी ते बोरिवलीतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेपर्यंत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) खाली बांधलेल्या दोन तीन-लेन बोगद्यांचा समावेश असेल..

– SGNP (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) ज्यामधून बोगदा जाईल त्या वनस्पती आणि प्राण्यांना कोणतीही हानी होणार नाही याची खात्री करण्यासाठी विशिष्ट खबरदारीचे उपाय केले जातील. यासाठी टनेल बोअरिंग मशीन (TBM) वापरण्यात येणार आहे.

– प्रत्येक 300 मीटरवर क्रॉस बोगद्याची व्यवस्था केली जाईल आणि त्याचे डिझाईन असं असेल की ही वाहने ताशी 80 किमी वेगाने जाऊ शकतील. ड्रेनेज सिस्टीम, स्मोक डिटेक्टर आणि जेट फॅन ही इतर काही फीचर्स असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.