Good News : PM Kisan च्या 15 व्या हप्त्याची तारीख ठरली ! ‘ही’ 3 कामे केली असेल तर शेतकऱ्यांना मिळणार 4 हजारांचा हप्ता..

0

केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत असून, त्याचा थेट लाभ देशातील अन्नदाता शेतकऱ्यांना मिळत आहे. मात्र आता आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सरकार शेतकऱ्यांसाठी मोठी पावले उचलत असून, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी हा यामागचा उद्देश आहे.

पीएम किसान निधी योजनेप्रमाणेच, महाराष्ट्र राज्य सरकारने दर 4 महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांना ₹ 2000 चा हप्ता देण्याची योजना देखील सुरू केली आहे सध्या पीएम किसान योजना केंद्र सरकार राबवत आहे. मात्र आता राज्य सरकारेही शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी त्यांच्या स्तरावर सरकारी योजना राबवत आहेत. आता शेतकऱ्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून ₹ 4000 चा हप्ता मिळणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना ₹ 4000 चा हप्ता मिळणार ते जाणून घेउयात..

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेला महाराष्ट्रात मंजुरी..

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही नवीन सरकारी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक ₹ 6000 ची आर्थिक मदत मिळणार आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी रुपयांच्या वितरणास मंजुरी देण्यात आली आहे.

पीएम किसान निधी योजनेप्रमाणेच, महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी ₹ 2000 चा हप्ता देण्याची योजना देखील सुरू केली आहे. सध्या, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही योजना एकत्रित करून वार्षिक ₹ 12000 ची आर्थिक मदत मिळेल. अशाप्रकारे, आता शेतकऱ्यांना शेतीसाठी सरकारकडून दरमहा ₹ 1000 मिळणार आहे.

4000 रुपये हवे असेल तर ही 3 कामे करावीच लागणार..

जे शेतकरी पीएम किसानचे लाभार्थी आहेत त्यांच्याकडे ई – केवायसी, लँड डिटेल्स सीडिंग आणि बँक खाते आधारशी जोडलेले असावे. हे तिन्ही करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर 2023 आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ई – केवायसी करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय, तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, तुमच्याकडे फक्त 2 चं दिवस उरले आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर हे काम करावं लागणार आहे.

फेस ऑथेंटिकेशनद्वारे करा eKYC

शेतकऱ्यांच्या डिजिटलायझेशनसाठी, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना घरोघरी फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसीची सुविधा मिळत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, घरोघरी फेस ऑथेंटिकेशनद्वारे शेतकऱ्यांचे जीवन साकार होत आहे. .

कधी येणार 15 वा हप्ता..

देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकरी योजनेचा 15 वा हप्ता जारी होण्याची वाट पाहत आहेत. माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता हा 12 नोव्हेंबरपूर्वी जारी केला जाण्याचा अंदाज आहे. कारण दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल या उद्देशाने हा हप्ता रिलीज केला जाऊ शकतो. त्यामुळे या हप्त्याबरोबरच महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांना अतिरिक्त 2 हजारांचा हप्ता मिळणार आहे.

केंद्र सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम वाढविण्याचा विचार करत आहे. शेतकऱ्यांना 6000 रुपयांऐवजी 8000 रुपये देण्याचा सरकार विचार करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.