केंद्रीय कर्मचाऱ्यांना नुकत्याच सणासुदीनिमित्त दिवाळीपूर्वी बोनस, महागाई भत्त्यात वाढ, तीन महिन्यांची थकबाकी, हे सर्व मिळाल्याने कर्मचारी खूश आहेत.परंतु, येणारं नवं वर्ष त्यांच्यासाठी आणखी चांगलं गिफ्ट घेऊन येणार आहे. विशेषत: महागाई भत्त्याच्या मोर्चावर चांगली बातमी त्यांची वाट पाहत आहे. 1 जुलै 2023 पासून महागाई भत्ता 46 टक्के करण्यात आला आहे. यानंतर जानेवारी 2024 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात सुधारणा केली जाणार आहे. हे रिव्हिजन आजपर्यंतची सर्वात मोठं रिव्हिजन असू शकते.

महागाई भत्ता 5 टक्क्यांनी वाढू शकतो का ?

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2024 हे वर्ष अनेक अर्थाने महत्त्वाचे असणार आहे. नव्या वेतन आयोगाबाबत काही ठोस चर्चा होऊ शकते. तसेच, महागाई भत्ता (DA) 50 टक्क्यांच्या वर जाऊ शकतो. तसेच, जर आपण ट्रेंड पाहिला तर, गेल्या 4 वेळा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण, त्यांना नवीन वर्षात मोठं गिफ्ट मिळू शकते. महागाई भत्त्यात आतापर्यंतची सर्वात मोठी 5 टक्के वाढ होऊ शकते.

AICPI निर्देशांक ठरवेल DA स्कोअर..

5 टक्के वाढ खरोखरच निश्चित आहे का ? सध्याच्या ट्रेंडनुसार महागाई भत्ता 51 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. असे झाल्यास 5 टक्क्यांची मोठी वाढ होईल. महागाई भत्ता केवळ AICPI निर्देशांकावरून मोजला जातो. निर्देशांकातील विविध क्षेत्रांमधून गोळा केलेल्या महागाईच्या आकडेवारीवरून कर्मचाऱ्यांचा भत्ता महागाईच्या तुलनेत किती वाढला पाहिजे हे दर्शविते..

काय आहे सध्याची परिस्थिती ?

जर आपण सद्यस्थितीवर नजर टाकली तर, जुलै आणि ऑगस्टसाठी AICPI निर्देशांक जाहीर झाले आहेत. लवकरच सप्टेंबर महिन्याची आकडेवारीही समोर येईल. सध्या निर्देशांक 139.2 अंकांवर आहे, ज्यामुळे महागाई भत्ता 47.98 टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबरमध्ये हा आकडा 48.50 टक्क्यांच्या पुढे जाईल असा अंदाज आहे. यानंतर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा डेटावरून जानेवारी 2024 मध्ये किती DA वाढणार हे ठरवलं जाईल. परंतु, यासाठी आपल्याला डिसेंबर 2023 च्या AICPI निर्देशांकांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ ..

7व्या वेतन आयोगांतर्गत, जुलै ते डिसेंबर 2023 या कालावधीतील AICPI क्रमांक केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता ठरवतील. महागाई भत्ता जवळपास 48 टक्क्यांवर पोहोचला आहे. चार महिन्यांचा आकडा अजून यायचा आहे. त्यात आणखी 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ दिसू शकते. महागाई भत्ता कॅल्क्युलेटर (DA कॅल्क्युलेटर) उर्वरित महिन्यांत 1 पॉइंटची वाढ दर्शवत आहे, त्यामुळे महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *