7th Pay Commission DA Hike : 46% DA तर झाला, पण पगारात नेमकी किती होणार वाढ ? पहा पगाराचे कॅल्क्युलेशन..
महागाई भत्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच वाढीव पगार दिला जाणार आहे. 1 जुलै 2023 पासून 46 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. मात्र, अद्याप त्याची घोषणा झालेली नाही. मात्र, त्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे. कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे अलीकडील AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.
अशा प्रकारे मोजला जातो DA..
DA मूळ पगारावर मोजला जातो. जर एखाद्याचा पगार 20,000 रुपये असेल तर 4 टक्के दराने त्याचा पगार एका महिन्यात 800 रुपयांनी वाढेल..
पगार किती वाढणार ? समजून घ्या कॅल्क्युलेशन..
7 व्या वेतन मॅट्रिक्सनुसार, अधिकारी श्रेणीच्या वेतनात बंपर वाढ होईल. जर कोणाचा मूळ पगार सध्या रु.31550 आहे. याचा हिशोब केला तर..
मूळ वेतन (बेसिक पे) – रु. 31550
नवीन महागाई भत्ता (DA) – 46% – रु. 14513 / महिना
सध्याचा महागाई भत्ता (DA) – 42% – रुपये 13251 / महिना
4% महागाई भत्ता (DA) वाढ – रुपये 1262 (दरमहा) अधिक मिळेल.
वार्षिक महागाई भत्ता – 4% वाढीवर 15144 रुपये अधिक मिळेल.
एकूण वार्षिक महागाई भत्ता – रु 1,74,156 (46 टक्के दराने) असेल..
कधी जाहीर केला जाणार DA..
जुलै 2023 साठी महागाई भत्ता निश्चित झाला आहे. पण, घोषणा व्हायला अजून वेळ आहे. सप्टेंबर महिन्यात त्याची घोषणा होऊ शकते, असे सूत्रांकडून समजते. साधारणपणे, सप्टेंबरमध्येच मंत्रिमंडळाकडून महागाई भत्ता मंजूर केला जातो. (7th Pay Commission DA Hike)
यानंतर वित्त मंत्रालय अधिसूचित करते आणि त्यानंतर ते केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिले जाते. या वाढीव महागाई भत्त्याचा फरक, जो दोन महिने शिल्लक आहे, तो केंद्रीय कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या स्वरूपात दिला जातो.