केंद्रीय कर्मचारी सणासुदीच्या काळात महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. नवरात्रीच्या काळात सरकार DA वाढवण्याची घोषणा करणार आहे, असं मानलं जात आहे. केंद्र सरकार 4% महागाई भत्ता वाढविण्याचा विचार करत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. असे झाल्यास DA चा दर सध्याच्या 42% वरून 46% पर्यंत वाढू शकतो. परंतु, सरकारकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे, परंतु आज आपण जर डीएमध्ये 4% वाढ झाली तर कर्मचाऱ्यांचा भत्ता किती रुपयांनी वाढेल, हे जाणून घेउया..
बेसिक सॅलरी 18,000 वर..
जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18,000 रुपये असेल, तर सध्या त्याला 42% DA च्या आधारे 7,560 रुपये मासिक भत्ता मिळत असेल. 4% वाढीसह, DA चा नवीन दर 46% होईल. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांचा मासिक भत्ता 8,280 रुपयांपर्यंत पोहचेल. मासिक आधारावर भत्त्यात 720 रुपयांची वाढ होणार आहे.
DA वर सरकारची नवीन मंजुरी 1 जुलैपासून लागू होईल. अशा परिस्थितीत कर्मचार्यांच्या आगामी पगारात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा म्हणजे एकूण 4 महिन्यांचा भत्ता जोडला जाणार आहे. अशा प्रकारे, 18,000 रुपये मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याच्या ऑक्टोबरच्या पगारात 2,880 रुपये भत्ता येणार आहे.
बेसिक सॅलरी 56,900 पगारावर..
56,900 बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचार्यांसाठी सध्याचा 42% DA त्यांच्या मासिक कमाईत रु. 23,898 जोडतो. डीएमध्ये 46% वाढ झाल्यानंतर, हा मासिक भत्ता वाढून 26,174 रुपये होईल. हा हाय बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांचा भत्ताही मिळेल. अशा कर्मचाऱ्याला ऑक्टोबरच्या पगारात 4 महिन्यांसाठी एकूण 9,104 रुपये भत्ता मिळेल..
केंद्र सरकारकडून दसरा किंवा विजया दशमी – मंगळवार, 24 ऑक्टोबर, किंवा दिवाळीच्या सुट्टीनंतर – रविवार, 12 नोव्हेंबर 2023 रोजी 4 टक्के DA वाढीची घोषणा केली जाईल.