Pune – Miraj Railways : आता पुणे ते सांगली 280Km चा प्रवास 4 तासांत शक्य होणार, दुहेरीकरणाच्या कामाने पकडला वेग, पहा असा असणार रूट..
मिरज – पुणे रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. सध्यस्थितीत दुहेरीकरणाचे 65 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित 35 टक्के काम वेगाने सुरु आहे. असे असले तरी रेल्वे पुलाचे काम, रेल्वे मार्गावरील डोंगराळ भाग, घाट, बोगदे आणि नदीवरील पुलांमुळे दुहेरीकरणाच्या कामास विलंब होत आहे. डिसेंबर 2023 अखेरपर्यंत दुहेरीकरण पूर्ण होण्याची शक्यता रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी बहुप्रतिक्षित असणारे आणि पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांच्या विकासाचे नवे दार आणि दळणवळणाच्यादृष्टीने अतिशय महत्वाच्या अशा पुणे – मिरज या रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचे काम गतीने सुरु आहे.
मिरज ते पुणे मार्गावर नांद्रे (ता. मिरज) रेल्वे स्टेशनपर्यंत दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. नांद्रे ते मिरज दुहेरीकरण जुलैपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मिरज – पुणे 280 किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणाच्या कामास सहा वर्षांपूर्वी सुरुवात झाली. दुहेरीकरणासाठी प्रवाशांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
रेल्वेने सांगलीहून पुण्याला पुण्याला जाण्यासाठी सुमारे सहा तास लागतात. दुहेरीकर मिरज पुणे रेल्वेमागांचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर सहा तासांच्या प्रवासाचा वेळ चार तासांवर येईल. दोन तासाने प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.
दुहेरीकरण पूर्ण झालेले रेल्वेमार्ग
पुणे – शिदवणे : 7 स्टेशनचे काम पूर्ण
आम्ले – नीरा : 4 स्टेशनचे काम पूर्ण
लोणंद – आदका : 3 स्टेशनचे काम पूर्ण
वाठार – जरडेश्वर 3 स्टेशनचे काम पूर्ण
सातारा – कोरेगाव काम पूर्ण
दुहेरीकरणाचे काम गतीने..
मिरज – पुणे रेल्वेमार्गावर दुहेरीकरणाचे काम 65 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित 35 टक्के काम गतीने सुरु आहे. सातारा जिल्ह्यात डोंगराळ भाग, घाटमार्ग, बोगदे, पुलामुळे कामास वेळ लागत आहे. या कामामुळे दुहेरीकरणास वेळ लागत आहे. दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर वेळ वाचून या मार्गावर जादा संख्येने रेल्वेगाड्या धावतील. – विवेककुमार पोद्दार , रेल्वे अधिकारी –
पर्यायी रस्त्यामुळे रेल्वे फाटक रस्ता 9 दिवस बंद..
रहिमतपूर स्टेशन ता. कोरेगाव येथील रेल्वेच्या उड्डाणपुलाच्या पर्यायी रस्त्याचे काम सुरु होणार आहे. 20 मे पर्यंत वाहनांसाठी रेल्वे फाटकातून जाणारा रस्ता पुर्णपणे बंद राहणार आहे.
दुहेरीकरण मार्गावरील अपूर्ण कामे..
शिंदवणे – आम्ले : 12 किमी डोंगर, बोगद्यामुळे विलंब
नीरा – लोणंद 1 स्टेशन, नदीवरील पुलामुळे विलंब
आदर्की – वाठार 1 स्टेशन, बोगद्यामुळे विलंब
जरंडेश्वर- सातारा : 1 स्टेशनचे काम पूर्णत्वास
कोरेगाव – शेणोली : काम सुरु आहे.
नांद्रे – मिरज जुलैपर्यंत काम पूर्णत्वाची शक्यता..