आपल्या हक्काचं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यातून मुंबई सारख्या महानगरात घर घेणं म्हणजे दिव्यचं नाही का ? आता मायानगरी मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाकडून तब्बल 4 हजारांहून अधिक परवडणाऱ्या घरांसाठी सोमवारी, 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर त्याच दिवसापासून नोंदणी, अर्ज विक्री – स्वीकृतीच्या प्रक्रियेस सुरुवात होणार असून ती 26 जूनपर्यंत सुरू राहणार असून 18 जुलै रोजी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईत स्वस्तात घर घेण्याची जवळपास 5 वर्षांपासून वाट पाहणाऱ्यांची अखेर स्वप्नपूर्ती होणार आहे.
मुंबई मंडळातील अनेक प्रकल्पांमध्ये म्हाडाच्या सदनिका उपलब्ध होणार आहेत. म्हाडा प्रशासन शहरातील विविध भागात तयार फ्लॅटची यादी तयार केली आहे. त्यापैकी पहाडी गोरेगावच्या दोन प्रकल्पांमध्ये सुमारे 2600 घरे पूर्ण झाली आहेत. यासोबतच पवई, सायन, बोरिवली आदी भागातील म्हाडाच्या प्रकल्पांशी संबंधित फ्लॅट्सचाही लॉटरीत समावेश केला आहे. सर्व परवडणाऱ्या घरांसाठी आता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.
म्हाडाच्या योजनेनुसार मुंबईतील गोरेगाव – पहारी परिसरात प्लॉट-A आणि प्लॉट- B या दोन भूखंडांवर म्हाडाची पंतप्रधान आवास योजनेतील 1,947 घरांसाठी लॉटरी लागणार आहे.
प्लॉट-A मध्ये 23 मजल्यांच्या सात इमारती बांधल्या जात आहेत, ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागासाठी (EWS) आहेत. येथे 322 चौरस फुटाचे एकूण 1,239 फ्लॅट आहेत. तर प्लॉट-बी मध्ये EWS आणि कमी उत्पन्न गटातील घर खरेदीदारांसाठी चार इमारती आहेत. यापैकी म्हाडाच्या लॉटरीत EWS साठी 708 फ्लॅट्स आणि LIG साठी 736 फ्लॅट्स उपलब्ध होणार आहे.
EWS श्रेणीसाठी फ्लॅटचा (कार्पेट एरिया 322 स्क्वेअर फूट) किंमत 35 लाख रुपये असेल तर LIG श्रेणीसाठी फ्लॅटची (कार्पेट एरिया 482 स्क्वेअर फूट) किंमत 45 लाखांपर्यंत असणार आहे.
यानंतर अॅन्टॉप हिलमध्ये 417 तर, विक्रोळीच्या कन्न्मवार नगरमधील 424 अशी एकूण 2 हजार 788 घरे समाविष्ट आहेत. तर, अल्प गटात एकूण 1022 घरे असून गोरेगावमधील पहाडी परिसरातील 737 घरांचा त्यात समावेश आहे.
उर्वरित घरे दादर, साकेत सोसायटी (गोरेगाव), गायकवाड नगर (मालाड), पत्राचाळ, जुने मागाठाणे (बोरिवली), चारकोप, कन्नमवार नगर, विक्रांत सोसायटी (विक्रोळी), गव्हाणपाडा आदी ठिकाणची आहेत.
त्याच वेळी मध्यम गटासाठी मंडळाने 132 घरे उपलब्ध करून दिली असून ही घरे दादर, टिळक नगर (चेंबूर), सहकार नगर (चेंबूर), कांदिवली येथील आहेत. तसेच उच्च गटासाठी केवळ 39 घरांचा समावेश असून ही घरे ताडदेव, लोअर परळ, शीव, शिंपोली, तुंगा पवई आदी ठिकाणी आहेत. अत्यल्प गटासाठीच्या घरांच्या किमती 30 लाख 44 हजार ते 40 लाख रुपयांपर्यंत आहेत..
मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये EWS घरांसाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये आहे, LIG फ्लॅटसाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 9 लाख रुपये आहे, MIG फ्लॅटसाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 12 रुपये आहे. लाख आणि एचआयजी फ्लॅटसाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये आहे. यासाठी, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 12 लाखांपेक्षा जास्त असावे.
पहाडी गोरेगाव येथील PMAY योजनेतील 1947 घरे ही 30 लाख 44 हजारांत मिळणार आहे. यामध्ये PMAY प्रत्येकी 2.50 लाखांचे अनुदान वजा होणार आहे.
एकूण घरे – 4083
* अत्यल्प – 2788
* अल्प – 1022
* मध्यम – 132
* उच्च – 38
* विखुरलेली – 102
महत्वाच्या तारखा पहा..
* जाहिरात – 22 मे नोंदणी..
* अर्ज विक्री – स्वीकृती – 22 मे
* अनामत रकमेसह अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 26 जून
* सोडतीची तारीख – 18 जुलै *
* सोडतीचे ठिकाण – रंगशारदा, वांद्रे, पश्चिम..