Egg Veg or Non Veg : अखेर वाद संपला..! अंड शाकाहारी की मांसाहारी ? शास्त्रज्ञांनी केले शिक्कामोर्तब..
अंडी व्हेजिटेरियन की नॉन – व्हेजिटेरियन हा वाद खूप दिवसांपासून सुरू आहे. लोक वेगवेगळे युक्तिवाद करून आपले म्हणणे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत, काहीजण म्हणतात की, कोंबडी अंडी घालते म्हणून ती मांसाहारी आहे, परंतु काही लोकांनी हा युक्तिवाद मोडून काढला की जनावरे देखील दूध देतात. त्यामुळे दूध देखील मांसाहारी झाला का? म्हणजे दूध जर शाकाहारी असेल तर अंडेही ? हा वाद संपत नाही तोच आता शास्त्रज्ञांनी या वादाचे उत्तर शोधले आहे.
अंडी शाकाहारी की मांसाहारी यावरील प्रत्येक वाद- विवादाबाबत शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, बहुतेक लोकांना असे वाटते की, कोंबडी अंडी देते म्हणून ती मांसाहारी आहे, असा विचार करून खात नाहीत, परंतु, बाजारात उपलब्ध असलेली बहुतांश अंडी अनफर्टिलाइज्ड असतात, म्हणजेच या अंड्यातून पिल्ले कधीच बाहेर येऊ शकत नाही.
शास्त्रज्ञांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की, अंड्यामध्ये 3 थर असतात, ज्यामध्ये सर्वात वरचा थर असतो कवच, दुसरा पांढरा भाग म्हणजे अल्ब्युमेन आणि तिसरा अंड्यातील पिवळ बलक असतो. संशोधनात असे आढळून आले की, पांढरा भाग हा केवळ प्रथिने आहे, ज्यामध्ये कोणतेही ऍनिमल सबस्टेन्स नसतात. म्हणजेच अंड्याचा पांढरा भाग पूर्णपणे शाकाहारी असतो. तर पिवळा बलक हा प्रथिने कोलेस्ट्रॉल आणि फॉस्फेट पासून बनलेला असतो.
कोंबडी सहा महिन्यांची झाली की दर दिवशी किंवा दोन दिवसातून एकदा अंडी देते. अंड देण्यासाठी नरा सोबत तिचे मिलन होण्याची आवश्यकता नसते अशा अंड्यांमध्ये जीव नसतो आपण जी अंडी नेहमी बाजारातून विकत आणतो ती पण फर्टीलाइज असतात. त्यामुळे त्यांना शाकाहारी समजण्यात यावे असे ठाम मत शास्त्रज्ञांचे आहे.
काय आहे हा अंड्याचा फंडा..
आता प्रश्न असा पडतो की, बाजारात मिळणारी अंडी जर शाकाहारी असतील तर मग मांसाहारी अंडी कशी ओळखणार ? आम्ही तुम्हाला सांगतो की, कोंबडीच्या संपर्कात आल्यानंतर जी अंडी घातली जातात त्यांना फलित अंडी म्हणतात. या अंड्यांमध्ये गेमेट पेशी असतात, ज्यामुळे ते मांसाहारी बनतात. जर आपण शाकाहारी आणि मांसाहारी अंडी कशी ओळखायची याबद्दल बोललो तर ते खूप सोपे आहे.
खोबणीत अंडी भरा आणि त्याखाली बल्ब लावा, ज्या अंडींमधून प्रकाश जाईल ती म्हणजे शाकाहारी अंडी आणि ज्या अंड्यातून प्रकाश जात नाहीत ती अंडी म्हणजे मांसाहारी अंडी आहेत.