राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रकल्प म्हणजे वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प त्यापाठोपाठ रायगड जिल्ह्यात होणार ‘बल्क ड्रग्ज पार्क’ प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेला. या घटनांना महिनाही नाही उलटला तोच आता नागपूर मध्ये होणार टाटा-एअरबसचा मोठा प्रकल्पही गुजरातला गेला अन् आता अशी माहिती मिळतेय की, नागपूरच्या मिहान मध्ये होणारा सॅफ्रन ग्रुपचा विमान तसंच रॉकेट इंजिन बनवणारा प्रकल्पही राज्याबाहेर गेला आहे. या घटनांमुळे देशातल्या क्रमांक 1 वर असलेला महाराष्ट्र आता कमजोर होऊ लागला आहे.
यामुळे सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेचीही प्रतिमा मालिन झाली असून आता केंद्र – राज्य सरकार थोडं का होईना जागं झालं आहे.
या पार्श्वभूमीवर आतापुणे जिल्ह्यातील रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. तालुक्यातील रांजणगाव MIDC त इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्लस्टर विकसित करणारा मोठा प्रकल्प येणार आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज सोमवारी केली आहे.
महाराष्ट्राला ‘इलेक्ट्रॉनिक्स हब’ बनवण्यासाठी रांजणगाव, पुणे येथे इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्लस्टर प्रकल्प मंजूर केला आहे. या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर्स (EMCs) मध्ये 5,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक मिळवण्याचे लक्ष्य आहे. येत्या प्रकल्पामुळे येत्या काही महिन्यांत 10 हजारांहून अधिक नोकऱ्या निर्माण होणार असल्याचं राजीव चंद्रशेखर यांनी सांगितलं आहे.
नेमका काय आहे हा प्रकल्प, किती होणार फायदा ?
इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादनांचे समूहकेंद्र (क्लस्टर) EMC च्या विकासासाठी एकूण 492.85 कोटी रुपये खर्च येणार असून त्यापैकी 207.98 कोटी रुपये भारत सरकार आणि उर्वरित 284.87 कोटी रुपये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) द्वारे योगदान दिलं जाणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, या समूहकेंद्राची निर्मिती झाल्यानंतर किमान 8 ते 10 हजार रोजगार निर्माण होणार आहे. ही गुंतवणूक 5 हजार कोटींपेक्षाही जास्त असणार आहे.
तसेच रांजणगाव MIDC त् IFB Refrigeration कंपनीने 40 एकर जमिनीवर 450 कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पासाठी बांधकामही सुरू केलं आहे. रस्ते, पाणी-वीज पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, ट्रक पार्किंग, व्यापार व संवाद केंद्र आदी पायाभूत सुविधांसह 32 महिन्यांमध्ये समूहकेंद्र विकसित केलं जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष प्रोडक्शन सेंटर विकसित केली जाणार आहे.
तसेच पुणे-बेस्ड CDAC, लवकरच महाराष्ट्रात भारत सेमीकंडक्टर मिशन आणि रु. 1,000 कोटी भविष्यातील डिझाइन योजनेअंतर्गत…स्टार्टअप्ससाठी पुण्यात रोड शो आयोजित करणार आहे. भारत सरकार सेमीकंडक्टर डिझाइन स्टार्टअप्समध्ये थेट गुंतवणूक करणार आहे.
रांजणगावात येणाऱ्या या प्रकल्पामुळे डॉ. खा. अमोल कोल्हे यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले