नागपूर ते पुणे प्रवास गाठा फक्त 8 तासांत ; पुणे – छ. संभाजीनगर एक्सप्रेस-वेला जोडला जाणार समृद्धी महामार्ग, पहा, रोडमॅप
सद्यःस्थितीत नागपूर ते पुणे हा प्रवास करताना प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजीनगरजवळ नवीन प्रस्तावित पुणे – संभाजीनगर (औरंगाबाद) एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्स्प्रेस – वे सोबत जोडण्यात येणार आहे.
हा महामार्ग ‘NHAI’ द्वारे संपूर्ण नवीन संरचना घेऊन तयार करण्यात येईल. यामुळे पुणे – छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) प्रवास अडीच तासांत आणि समृद्धी महामार्गाद्वारे नागपूर औरंगाबाद प्रवास साडेपाच तासांत करता येणे शक्य होणार आहे.
नागपूर ते पुणे हा प्रवास यामुळे आठ तासांत होणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाजमाध्यमांवरून घोषित केले. नागपूर – मुंबईला जोडणारा समृद्धी द्रुतगती मार्ग नागपूर ते शिर्डी लवकरच कार्यान्वित होणार आहे . नागपूर ते औरंगाबाद हे अंतर 410Km आहे आणि पुढे समृद्धी महामार्गाला 268Km अंतराच्या औरंगाबाद -पुणे एक्स्प्रेस – वे सोबत जोडण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूर ते पुणे असे एकूण 678Km लांब अंतर 8 तासांत पार करता येईल.
पुणे – नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी समृद्धी महामार्गाला औरंगाबाद येथून नवीन मार्ग जोडणार असल्याचे गडकरी यांनी ट्विट करून सांगितले . सध्याच्या पुणे – अहमदनगर – औरंगाबाद महामार्गावरील रस्ता संपर्क स्थानिक वाहतूक आणि औद्योगिक वाहतुकीने ओव्हरलोड आहे.
पुणे – नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी नवा मार्ग बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्गाला जोडण्याची घोषणा गडकरी यांनी केली. एक्स्प्रेस – वे जोडणीमुळे पुण्यावरून नागपूरला किंवा नागपूरवरून पुण्याला 8 तासांत पोहोचणे शक्य होणार आहे.
सध्या मुंबई व नागपूर या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहराला जोडणारा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग चर्चेत आहे. यातच आता पुणे – नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी समृद्धी महामार्गाला जोडून नवीन महामार्ग तयार केला जाणार आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) असा नवा मार्ग तयार केला जाणार आहे.
पुणे ते औरंगाबाद हा एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्स्प्रेस – वे तयार करून तो औरंगाबादजवळ समृद्धी मार्गाला जोडला जाईल. तसेच पुणे ते औरंगाबाददरम्यान अविकसित क्षेत्रातून जाणाऱ्या या मार्गामुळे त्या भागातील आर्थिक विकासालादेखील चालना मिळेल.
[…] […]