सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक दुर्बल घटकांसाठीचे (ईडब्ल्यूएस) 10% आरक्षण वैध ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. यामुळे अन्य आरक्षणाचे लाभ न मिळणाऱ्या आर्थिक दुर्बलांना सरकारी नोकऱ्या, तसेच शैक्षणिक संस्थांतील प्रवेशासाठी राखीव जागांचा लाभ मिळू शकणार आहे.

EWS म्हणजे नेमकं काय ?

EWS म्हणजे Economically Weaker Sections अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना EWS अंतर्गत शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळू शकतं. हे आरक्षण एससी, एसटी, एनटी यांच्यासाठी नसून थोडक्यात ओपन कॅटगरीसाठी आहे.

आर्थिक दुर्बलत्वासाठीचे कोणते आहे निकष ?

उत्पन्नाची मर्यादा वार्षिक 8 लाख रुपयांपर्यंत असावी.

कुटुंबाची शेती 5 एकरांपेक्षा अधिक नसावी.

एक हजार चौरस फूट किंवा त्याहून मोठे रहिवासी घराचे क्षेत्र नसावे.

महापालिका क्षेत्रातील कुटुंबांचे रहिवासी घराचे क्षेत्र 900 चौरस फुटांपेक्षा जास्त नसावे.

गैर नगरपालिका किंवा ग्रामीण भागातील कुटुंबासाठी 1800 चौरस फूट जागेची मर्यादा.

हे निकष पूर्ण करणाऱ्यांना आर्थिक दुर्बलासाठीच्या आरक्षणाचा लाभ घेता येईल.

आर्थिक दुर्बलत्वाचे प्रमाणपत्र कोठून आणायचे ?

हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात अर्जामध्ये आपल्या जातीचा उल्लेख करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. दाखल केलेल्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर लाभार्थ्यांना हे प्रमाणपत्र प्राप्त होईल.

आवश्यक कागदपत्रे ?

लाभार्थी व त्यांच्या वडिलांचे आधार कार्ड.
लाभार्थी व त्यांच्या वडिलांची TC / निर्गम उतारा.
शिधापत्रिका.
रहिवाशी प्रमाणपत्र.
उत्पन्नाचा पुरावा (सातबारा, 8अ / फॉर्म 16 / आयकर भरल्याचा पुरावा).
अर्जदार किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्राचे रहिवाशी असल्या बाबतचा पुरावा.
स्वघोषणा पत्र.
विहित नमुन्यातील अर्ज.
3 पासपोर्ट फोटो.
ही सर्व कागदपत्रे खरी असल्याचा पुरावा घोषणापत्र

तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयामधून 20 रुपये देऊन अर्ज घ्यावा. 

किंवा या लिंकवरन अर्ज डाउनलोड करा :- लिंक –  EWS आरक्षण PDF फॉर्म

तलाठी कार्यालयात जाऊन आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, तीन साक्षीदारांचे पुरावे, उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रांची तलाठी कार्यालयात जाऊन पडताळणी करावी.

नंतर ती कागदपत्रे सेतू कार्यालयात जमा करावीत. तेथून पावती देण्यात येते. त्याकरता 25 रुपये शुल्क आकारले जाते. याच वेळी लाभार्थी स्वतः उपस्थित असणे आवश्यक असते. त्याचे छायाचित्र तेथे स्कॅन केले जाते. यानंतर तहसील कार्यालयातून कागदपत्रांची पडताळणी होऊन सात दिवसांनी ईडब्ल्यूएसचा (EWS) दाखला देण्यात येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *