आता जुन्या फळबागाच्या पुनरूज्जीवनासाठीही मिळतंय 50,000 अनुदान, ड्रॅगनफ्रुटसाठी तर हेक्टरी 4 लाख रु. पहा पात्रता, अर्ज प्रोसेस..
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानंतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन उपक्रम राबवण्यात येत आहे. राज्यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढवणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढवण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत असून या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.
विदेशी फळे, फुले, मसाला लागवड करणे तसेच जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी इत्यादी फळ पिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी या पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोवनणे यांनी कळवले आहे.
अशी आहे अनुदान मयार्दा..
फुले लागवड : कट फ्लावर्स
अल्प भूधारक शेतकरी : रुपये 1 लाख प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रुपये 40 हजार प्रति हेक्टर..
इतर शेतकरी : रुपये 1 लाख प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल रुपये 25 हजार प्रति हेक्टर.
कंदवर्गीय फुले : –
अल्प भूधारक शेतकरी, रुपये १ लाख ५० हजार प्रति हेक्टर : एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल रुपये ६० हजार प्रति हेक्टर.
इतर शेतकरी : रुपये 1 लाख 50 हजार प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल रुपये 37 हजार 500 प्रति हेक्टर.
सुटी फुले :-
अल्प भूधारक शेतकरी रुपये 40 हजार प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रुपये 16 हजार प्रति हेक्टर.
इतर शेतकरी : रुपये 40 हजार प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल रुपये 10 हजार प्रति हेक्टर.
मसाला पिक लागवड :
बिया वर्गीय व कंद वर्गीय मसाला पिके, रुपये 30 हजार प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रुपये 12 हजार प्रति हेक्टर.
बहुवर्षीय मसाला पिके :
रुपये 50 हजार प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रुपये 20 हजार प्रति हेक्टर.
विदेश फळपिक लागवड : :
ड्रॅगनफ्रुट : रुपये 4 लाख प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रुपये 1 लाख 60 हजार प्रति हेक्टर.
स्ट्रॉबेरी : रुपये 2 लाख 80 हजार प्रति हेक्टर , एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल रुपये १ लाख १२ हजार प्रति हेक्टर .
अवॅकॅडो : रुपये 1 लाख हजार प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रुपये 40 हजार प्रति हेक्टर .
जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन : रुपये 40 हजार प्रति हेक्टर, एकूण खर्चाच्या 50 टक्के व जास्तीत जास्त रुपये 20 हजार प्रति हेक्टर.
फळपीक योजनेसाठी महा डीबीटी पोर्टलवर अर्ज कसा कराल ?
अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा