Land Distribution : राज्यातील तब्बल 17929 जमिनींचे मोफत वितरण, जिरायतीसाठी 20 लाख रु. तर बागायतीसाठी मिळतंय 16 लाख रु. अर्थसहाय्य..

0

राज्यातील बहुतांश शेतमजुरांकडे स्वतःची शेत जमीन नसते त्यामुळे ते सतत दुसऱ्यांच्या शेतात काम करतात त्यामुळे त्यांना त्याच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नाही त्यामुळे त्यांचा आर्थिक विकास होत नाही.त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजूरांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी दोन एकर ओलीताखालील किंवा चार एकर कोरडवाहू शेतजमीन कसण्यासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने ही कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना सुरु केली आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सन 2004-05 पासून राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रयरेषेखालील भूमीहिन कुटूंबांना चार एकर जिरायती (कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती (ओलीताखालील) जमिन उपलब्ध करून देण्यात येते.

या योजनेअंतर्गत राज्यात गेल्या 20 वर्षांत तब्बल 17 हजार 929 एकर जमिनींचे वितरण करण्यात आले आहे. याचा लाभ राज्यातील 6 हजार 764 कुटुंबांना झाला आहे.

जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी 50 टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज व 50 टक्के रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते होते, परंतु 2018 मध्ये एक नवा शासन निर्णय प्रसिद्ध करून यात बदल करण्यात आले असून पूर्णच्या पूर्ण रक्कम म्हणजे 100% रक्कम अनुदान स्वरूपामध्ये देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

किती मिळतंय आर्थिक साहाय्य ? पात्रता, कागदपत्रे ? पाह्यण्यासाठी खालील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा..

100% अनुदानाने दिला जातो लाभ..

या योजनेअंतर्गत 4 एकर जिरायती (कोरडवाहू जमीन) जमीन खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त 16 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जातं तर
2 एकरांपर्यंत बागायती जमीन खरेदी करण्यासाठी 8 लाख रुपये प्रति – एकर नुसार जास्तीत जास्त 16 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जातं.

बातमी : जमीन खरेदीसाठी 100% अनुदान..

आवश्यक कागदपत्रे

1. जातीचा दाखला
2. उत्पन्नाचा दाखला
3. भूमिहिन असल्याबाबत तलाठ्याचा दाखला
4. विधवा किंवा परित्यक्त्या तलाठ्याचा दाखला
5. भूमिहिन शेत मजूर असल्याबाबतचा तलाठ्याचा दाखला
6. दारिद्र्यरेषेचे प्रमाणपत्र ( ग्रामसेवकाचे )
7. रेशन कार्डाची छायांकित प्रत
8 .अनुसूचित जाती / जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अत्याचार पिडीत असल्याचा पुरावा

या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या महत्वाच्या लिंक / शासन निर्णय / PDF फॉर्म डाउनलोड करा.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्बळीकरण व स्वाभिमान योजना 

               अर्जाचा नमुना – PDF फॉर्म   

जमीन विकण्यास ईच्छुक असलेल्या शेतक -याने सादर करावयाचा प्रस्ताव अर्ज :- PDF फॉर्म

2018 चा शासन निर्णय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

अर्जांसासोबत सोडवायची कागदपत्रे पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.