भारतीय शेतकर्यांना त्यांची शेती चिंतामुक्त करण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) ही योजना एक महत्त्वाची सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एसबीआय (SBI) किंवा इतर कोणत्याही बँकेत खाते उघडल्यानंतर तीन लाख रुपयांपर्यंतचा लाभ दिला जातो.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, किसान क्रेडिट कार्ड योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेती आणि इतर गरजांसाठी बँकिंग सिस्टीमद्वारे कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देणे आहे. या योजनेंतर्गत, शेतकरी कमाल 7 टक्के व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात आणि कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास त्यांना 3 टक्के सवलतही मिळते.
किसान क्रेडिट कार्ड योजनेचे मुख्य फायदे..
शेतकऱ्यांना परवडणाऱ्या व्याजदरावर कर्ज :-
किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना परवडणाऱ्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते, जेणेकरून त्यांना त्यांच्या शेतीसाठी आर्थिक मदत मिळू शकेल.
सुलभ कर्ज उपलब्धता :-
योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने कर्ज मिळण्याची सुविधा आहे, ज्यामुळे त्यांना विविध शेतीशी संबंधित कामांसाठी आर्थिक मदत मिळते.
व्याज सवलत :-
योजनेंतर्गत, वेळेवर कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना 3% व्याज सवलत देखील दिली जाते, जो त्यांच्यासाठी एक अतिशय फायदेशीर पर्याय आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज कसा कराल ?
अर्ज – PDF फॉर्म
दोन पासपोर्ट साइज फोटो.
आयडी पुरावा जसे की, ड्रायव्हिंग लायसन्स / आधार कार्ड / मतदार ओळखपत्र / पासपोर्ट, इ. कोणतेही एक दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे.
पत्ता पुरावा जसे की, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड इ.
महसूल अधिकार्यांनी रीतसर प्रमाणित केलेल्या जमिनीचा पुरावा. – 7/12
एकरी क्षेत्रासह पीक पद्धती (घेतलेली पीके).
1.60 लाख / रु.3.00 लाखांपेक्षा जास्त कर्ज मर्यादेसाठी सुरक्षा दस्तऐवज
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्जदाराने प्रथम PM किसान पोर्टलवरून KCC फॉर्म डाउनलोड करणे आवश्यक आहे. अर्जदाराची माहिती, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि शेतीशी संबंधित कागदपत्रे फॉर्ममध्ये टाकावी लागतील.
फॉर्म भरल्यानंतर, जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ बडोदा किंवा इतर कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन खाते उघडावे लागेल. कर्जाची रक्कम खात्यावर वर्ग होणार असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकणार आहे..