भारतीय मेट्रोच्या इतिहासात पहिल्यांदाचं 9 एप्रिल रोजी ऐतिहासिक चाचणी झाली आहे. देशातील सर्वात जुनी कोलकाता मेट्रो आज भारतात प्रथमच पाण्याखालील मेट्रोची चाचणी घेणार आहे. हुगळी नदीच्या पात्रात ही चाचणी केली जात आहे. हा बोगदा 520 मीटर लांबीचा असून जो सॉल्ट लेक डेपो ते हावडा मैदान या मार्गावर सियालदह आणि एस्प्लेनेड दरम्यान येतो. हुगळी नदीच्या आत बांधण्यात आलेल्या बोगद्यातून आज 6 डबे असलेल्या दोन मेट्रोची चाचणी घेतली असून यशस्वी झाली आहे.
ग्रीन लाइन मेट्रोवर आहे हा बोगदा..
पाण्याखालील मेट्रो मार्ग कोलकाता मेट्रोच्या ग्रीन लाइनवर स्थित आहे, जो 16.6 किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर आहे. तो पूर्व कोलकातामधील IT हब सॉल्ट लेक सेक्टर V आणि पश्चिमेला हावडा मैदान यांना जोडतो. हा मार्ग सियालदह आणि एस्प्लेनेडमधून जातो. या कॉरिडॉरचा पहिला टप्पा सेक्टर 5 ते सियालदह दरम्यान आहे. सध्या तो कार्यान्वित आहे.
बॅटरीच्या मदतीने पूर्ण केली मेट्रो टेस्ट..
आजच्या चाचणीत, दोन मेट्रो ट्रेन साल्ट लेकर सेक्टर पाचमधून हावडा मैदानाकडे जाईल. या मार्गावर सियालदह आणि एस्प्लेनेड दरम्यान पाण्याखालील बोगदा आहे. या संपूर्ण विभागाचे अंतर 2.5 किमी आहे. सियालदहपर्यंत मेट्रो सामान्यपणे येईल. यानंतर बोगद्यातील एस्प्लेनेडपर्यंतचा प्रवास बॅटरीच्या मदतीने केला जाईल. बोगद्यातील विद्युतीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही..
पूर्वेकडील बोगद्यावर केली जाणार चाचणी..
कोलकाता मेट्रो ग्रीन लाईन किंवा ईस्ट – वेस्ट कॉरिडॉर बद्दल बोलायचे तर ते 16.6 किमी लांब आहे. हे सेक्टर 5 आणि हावडा यांना जोडते. सेक्टर 5 ते सियालदह या दरम्यान मेट्रोचे ऑपरेशन सुरू आहे, ज्या दरम्यान एकूण सहा स्टेशन आहेत. सियालदाह आणि एस्प्लेनेड दरम्यान एक बोगदा आहे जो हुगळी नदीच्या आत बांधला आहे.
या बोगद्याची लांबी 520 मीटर आहे. सियालदाह – एस्प्लेनेड विभाग 2.5 किमीचा आहे. त्यानंतर एस्प्लेनेड – हावडा विभाग 4.5 किलोमीटरचा आहे. या बोगद्यात आज मेट्रोची ट्रायल होणार आहे. पूर्वेकडील बोगद्याच्या मदतीने, मेट्रो सॉल्ट लेक सेक्टर V मधून हावडाकडे जाईल. त्या बदल्यात पश्चिमेकडील बोगद्याचे काम अद्याप अपूर्ण आहे.
पूर्व-पश्चिम कॉरिडॉरमध्ये किती आहेत स्टेशन्स ?
या मार्गावर एकूण 12 स्टेशन आहेत – हावडा मैदान, हावडा स्टेशन कॉम्प्लेक्स, बीबीडी बाग (महाकरण), एस्प्लानेड, सियालदाह, फूलबागन, सॉल्ट लेक स्टेडियम, बंगाल केमिकल, सिटी सेंटर, सेंट्रल पार्क, करुणामयी आणि सॉल्ट लेक सेक्टर-V.
कोलकाता मेट्रो 1984 मध्ये सुरू झाली
पाण्याखालील चाचणी यशस्वी झाल्यास कोलकाता मेट्रोसाठी ही मोठी उपलब्धी असेल. भारतातील पहिली मेट्रो 1984 साली कोलकात्यातच सुरू झाली. 18 वर्षांनंतर 2002 साली दिल्लीत मेट्रोचे काम सुरू झाले.