ग्रामीण भागात शेतजमिनीच्या ताब्यावरून गावागावात होणारे टोकाचे वाद आपण कायम पाहत असतो. हे वाद अनेक वर्षांपासून आपण अनुभवत असून याबाबतीत अनेक अशी प्रकरणे पोलिस, कोर्टात प्रलंबित आहेत. याच जमिनीच्या वादामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कोर्ट-कचेरीत फेऱ्या मारत आहेत. या जमिनीच्या वादांमुळे सख्खे भाऊही पक्के वैरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 

आता राज्य सरकारने हे वाद सोडवण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यासाठी ‘सलोखा’ नावाच्या नवीन योजनेस मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. परंतु ही योजना कशी राबवली जाणार ? याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत..

शेतजमिनीच्या ताब्यावरून भाऊबंदकीतले वाद मिटवणाऱ्या सलोखा योजनेस राज्य मंत्रिमंडळाने अखेर मान्यता दिली. यासाठी मुद्रांक शुल्क केवळ 1000 रुपये तर नोंदणी शुल्क 100 रुपये आकारण्यात येणार आहे. शेतजमिनीच्या ताबा व वहिवाटीबाबत अनेक शेतकऱ्यांमध्ये आपापसात वाद मिटविण्यासाठी व सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी ही योजना अंमलात आणली जाणार आहे.

या योजनेत शेतकऱ्यांची आपापसातील वादग्रस्त जामीन सलोख्याने व सामंजस्याने आदण प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी अदलाबदल दस्तऐवजांसाठी लागणाऱ्या शुल्कामध्ये खास सवलत देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील एकूण वादग्रस्त जमीन किती आहे ?

महाराष्ट्रात एकूण जमिनधारकांची संख्या 3,37,88,253 एवढी असून एकूण वहिवाटदार शेतकरी 1 कोटी 52 लाख इतके आहेत. शेत जमिनीच्या ताब्यासंदर्भात एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या पाहायला गेले तर ती 13,28,340 इतकी आहे.

या सालोखा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी 15 दिवसात पंचनामा करणे आवश्यक असल्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत .

या योजनेमुळे भाऊबंदकीचे वादात अडकलेल्या शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होण्यास मदत होईल. तसेच विविध न्यायालयातील प्रकरणे देखील यामुळे निकाली निघतील. या योजनेमुळे भूमाफियांचा असलेला अनावश्यक हस्तक्षेप सुद्धा यामुळे टाळता येणार आहे.

किती शुल्क आकारले जाणार..

या सलोखा योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी मुद्रांक शुल्क केवळ 1000 रुपये तर नोंदणी शुल्क 100 रुपये आकारण्यात येणार आहे.

तर शेतकरी मित्रांनो, याबाबतचा शासन निर्णय (GR) लवकरच प्रसिद्ध केला जाणार असून त्यातील नियम, अटी काय असतील ? ही योजना कशी राबवली जाणार? याबाबत शासन निर्णय आल्यानंतर आपण अपडेट पाहणार आहोत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *