देशातील तरुण आणि युवा उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा स्वतःचा असणारा व्यवसाय मजबूत करायचा असेल तर अशा तरुणांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना खूप उपयुक्त ठरू शकते. तरुणांना स्वावलंबी बनवण्याच्या आणि छोट्या व्यावसायिकांना बळ देण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने 2015 साली ही योजना सुरू केली.
या योजनेत बिगर कॉर्पोरेट आणि बिगर कृषी व्यवसायांसाठी कर्ज दिले जाते. या योजनेद्वारे, 10 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज घेतले जाऊ शकते, म्हणजे, तुम्हाला तुमची कोणतीही मालमत्ता इत्यादी गहाण ठेवण्याची आवश्यकता नाही.
PMMY चे काय आहेत फायदे..
प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गरजेनुसार 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. हे कर्ज तारणमुक्त तर आहेच, याशिवाय त्यावर कोणतीही प्रक्रिया शुल्क आकारली जात नाही.
या योजनेअंतर्गत उपलब्ध कर्जाचा एकूण परतफेड कालावधी 12 महिने ते 5 वर्षांपर्यंत देण्यात आला आहे. पण जर तुम्ही सादर कर्जाची 5 वर्षात परतफेड करू शकत नसाल तर त्याचा कालावधी 5 वर्षांनी वाढवला देखील जाऊ शकतो.
या कर्जाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला मंजूर कर्जाच्या संपूर्ण रकमेवर व्याज द्यावे लागत नाही. तुम्ही मुद्रा कार्डद्वारे पैसे काढण्यासाठी खर्च केलेल्या रकमेवरच व्याज आकारले जाते.
तुम्ही जर भागीदारीमध्ये एखादा व्यवसाय सुरु करत असला तरी सुद्धा तुम्ही मुद्रा योजनेद्वारे कर्ज घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला 3 प्रकारामध्ये कर्ज मिळण्याची व्यवस्था केली आहे. यावरील व्याजदर श्रेणीनुसार बदलतात.
भागीदारी कर्जाच्या आहेत तीन श्रेणी :-
जर तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्ही कोणत्याही सरकारी-खाजगी बँका तसेच प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँका, गैर-वित्तीय बँकांमध्ये कर्जासाठी अर्ज करू शकता. कर्जाच्या रकमेची मर्यादा वर्गवारीनुसार करण्यात आली आहे. कर्जाचे तीन प्रकार जाणून घ्या-
शिशू कर्ज – या प्रकाराच्या माध्यमातून 50,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.
किशोर कर्ज – या प्रकाराच्या माध्यमातून 5 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
तरुण कर्ज – या प्रकाराच्या माध्यमातून 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम कर्ज म्हणून दिली जाते.
असा करा अर्ज :-
सर्वप्रथम मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइट mudra.org.in वर जा.
मुखपृष्ठ उघडताच शिशु, किशोर आणि तरुण असे लिहिलेले तीन प्रकारचे कर्ज प्रकार दिसतील, तुम्ही तुमच्या आवडीनुसार श्रेणी निवडू शकता.
त्यानंतर एक नवीन पेज उघडेल, येथून तुम्हाला अर्ज डाउनलोड करून या अर्जाची प्रिंट काढावी लागेल.
शिशू कर्ज :- PDF फॉर्म
किशोर कर्ज :- PDF फॉर्म
तरुण कर्ज :- PDF फॉर्म
सदर अर्ज योग्यरित्या भरा, काही कागदपत्रांच्या छायाप्रती मागवल्या जातील जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, कायमस्वरूपी आणि व्यावसायिक पत्त्याचा पुरावा, आयकर रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्नची प्रत आणि पासपोर्ट आकाराचा फोटो इ.
हा अर्ज तुमच्या जवळच्या बँकेत जमा करा. बँक तुमच्या अर्जाची पडताळणी करेल आणि कर्ज 1 महिन्याच्या आत वितरित केले जाईल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी युजर नेम आणि पासवर्ड तयार करावा लागेल. त्याच्या मदतीने, मुद्रा कर्ज वेबसाइटवर लॉग इन करा. या ठिकाणी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता…