Pune: मारुतीराव मानलं तुम्हाला..! शिरूरमध्ये एकरी 120 टन उसाचं उत्पादन घेत केला नवा विक्रम; जाणून घ्या, नेमकं कसं वाढवलं उत्पादन..

0

महागाईच्या या जमान्यात बहुतांश शेतकरी शेती परवडत नाही असे सऱ्हास बोलताना दिसून येतात. पण शिरूर येथील एका शेतकऱ्याने मात्र हे वाक्य खोटे ठरवले आहे. मारुती केरबा कदम असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

विशेष म्हणजे मारुतीरावांकडे स्वतःची जमीन सुद्धा नाही. सध्या मारुती केरबा कदम हे तुकाराम बापू पोटे (मामा) न्हावरे, तालुका. शिरूर, जिल्हा. पुणे यांची शेती कंसात आहे. मारुती कदम यांनी संपूर्ण पंचक्रोशीत अभ्यासू व प्रयोगशील ऊस उत्पादक म्हणून नाव कमावले आहे.

मारुती कदम यांनी आपल्या शेतात ऊसाची 86032 या जातीच्या बेण्याची लागवड केली आहे. या उसाच्या जातीने त्यांना एकरी 120 टन इतके उत्पन्न मिळवून दिले आहे. ही सर्व ऊस शेती त्यांनी ड्रीप सिस्टीम मध्ये केलेली आहे. त्यांनी एका एकरात आडसाली ऊसाची लागवड केली होती. या एक एकरातून त्यांनी 120 टन इतके ऊसाचे विक्रमी उत्त्पन्न मिळवले आहे. त्यांच्या शेतातील एका उसाचे वजन तब्बल 5 किलो इतके भरले आहे.

असे करा ऊस लागवडी नंतरचे नियोजन :-

ऊस लागवडीचे नियोजन कसे करावे याबाबत सांगताना मारुती राव म्हणाले, ऊस लागवडीनंतर बुरशीनाशकाचा व ह्युमिक अँसिडचा वापर करावा, यामुळे उसात बुरशी उत्पन्न होत नाही. प्रत्येक 8 दिवसाला विरघळणाऱ्या खतांचा वापर करण्यात यावा, त्यामध्ये 12:61 4 किलो, 00:50 3 किलो आणि यूरिया 5 किलो त्यानंतर आठ दिवसांनी मॅग्नेशियम 5 किलो वापरावे. नंतर बाळ चाळणीला एकरी 3 बॅग रासायनिक खताच्या 1) यूरिया, 2) 00:24:24 3) सिलिकॉन याप्रमाणे वापराव्यात असाही सल्ला मारुतीरावांनी दिला.

मारुतीरावांनी आपल्या यशस्वी ऊस लागवडीचे गुपित उलगडताना त्यांनी सांगितले की, 4 महिन्यांनंतर उस बांधणीसाठी आला असता उसाला रासायनिक खताचा मिक्स डोस देण्यात आला होता.

उसाची जोमात वाढ व्हावी यासाठी परत 50 बॅग कोंबड खताचा वापर केलेला आहे. जमीन भुसभूषित होण्यासाठी 5 लिटर फॉस्फरिक ऍसिड वापरलेले आहे. दर 6 दिवसाला 8 तास ड्रीप ने पाणी द्यायचे व महिन्यातून एकदा पाटाने पानी दिले आहे.

उस तोडणी अगोदर 2 महिने जैविक स्लरीचा डोस देण्यात आला आहे. यासाठी 4 किलो गूळ, 4 लिटर ताक, 5 लिटर गोमूत्र. 1 लिटर बॅक्टेरिया म्हणजे जिवाणू अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले होते. त्यामुळेच मला हा रिझल्ट मिळालेला आहे.

या मिळालेल्या रिजल्ट मुळे मी खूप समाधानी आहे. असे मारुती कदम यांनी सांगितले. मारुती कदम यांनी विक्रमी एकरी 120 टन उत्पादन घेत राज्यातील इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.