महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या उपक्रमाने आता ग्रामपंचायतीचे सर्व दाखले घरबसल्या मिळणार आहे त्यामुळे नागरिकांना ग्रामपंचायतीमधील सुविधा ऑनलाइन मिळू लागल्या आहेत.
पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील कोडीत बुद्रुक ग्रामपंचायतीने डिजिटल अॅपद्वारे दाखले देणे सुरू केले आहे. या अॅपद्वारे ग्रामपंचायत हद्दीतील घराचा उतारा, जन्म, मृत्यू नोंद प्रमाणपत्र, विवाह नोंद प्रमाणपत्र उपलब्ध होणार असून कराचा भरणाही करता येणार आहे.
महाराष्ट्र शासनाने महा – ई ग्राम सिटीझन कनेक्ट नावाचे अप्लिकेशन (mahaegram Citizen Connect – Apps) केले. आत्तापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांनी हे अॅप्लिकेशन डाउनलोड केलं आहे.
या अॅप्लिकेशनमुळे सर्वांना घरबसल्या ग्रामपंचायतचे सर्व दाखले मोबाइल अॅपद्वारे उपलब्ध होणार आहेत. पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील कोडीत बुद्रुक ग्रामपंचायतीने डिजिटल अॅपद्वारे 80 पेक्षा जास्त व्यवहारांची नोंद केली आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक व्यवहार नोंदी करून कोडीत बुद्रुक ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकवल्याची माहिती ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच रंजना खुटवड़ यांनी दिली. ग्रामपंचायतीने डिजिटल ॲपविषयी गावातील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली. तसेच डिजिटल अॅपविषयी गावातील नागरिकांना माहिती सांगण्यात आली व नागरिकांना डिजिटल अॅप वापरण्यास प्रोत्साहित करण्यात आले.
अॅपविषयी नागरिकांना माहिती मिळाल्यामुळे त्यांनी आपले प्रॉपर्टी टॅक्स भरण्यास सुरुवात केली आहे. आपला दाखल प्रमाणपत्र ऑनलाइन काढण्यास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
अॅप डाउनलोड करण्यासाठी आणि दाखले ऑनलाईन मिळवण्यासाठी…
इथे क्लिक करा
ग्रामपंचायतच्या माध्यमातून वतीने महा ई ग्राम डिजिटल अॅप जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम चालू असून नागरिकांना याअॅपचे महत्व नागरिकांना पटले आहे. यामुळे नागरिकांचे काम सुलभ झाले असून वेळेची बचत होत आहे.
ग्रामपंचायत अलीकडच्या काळात संपूर्ण गावांमध्ये विकास कामासंदर्भात अग्रेसर काम करत आहे. पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक आल्याने समाधान वाटल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट अॅप नागरिकांपर्यंत पोहोचविणे व नागरिकांना या अॅपविषयी माहिती देऊन त्यांच्यात जागरुकता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोद बडदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह आजी, माजी पदाधिकारी यांचेही मोठे योगदान मिळाले.
सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने येण्याचा बहुमान मिळाला. यापुढील काळात याचपद्धतीने काम करून शासनाचे उपक्रम लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल. – रंजना खुटवड, सरपंच, कोडीत बुद्रुक, ता. पुरंदर..