पशुपालकांसाठी खुशखबर ! 1 बोकड व 10 शेळ्यांसाठी मिळवा 71,239 रु. अनुदान, अर्जाचा आजचा शेवटचा दिवस, पहा, ऑनलाईन अर्ज प्रोसेस..
राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वात महत्वाचा जोडधंदा म्हणजे पशुपालन. त्यातही ज्या शेतकऱ्यांना कमी जमीन आहे अश्या शेतकऱ्यांना शेळीपालन हा व्यवसाय अत्यंत उपयोगी ठरतो. राज्यातील गावागावांत शेळी पालन व्यवसायाला चालना मिळावी, त्यातून आर्थिक स्रोत निर्माण व्हावेत, यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने 1 बोकड व 10 शेळ्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी लाभार्थ्याला 90% अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये प्रति बोकड 6,000 रुपये तर प्रति शेळी 5,000 रु. असे संपूर्ण प्रकल्प खर्च 66,000 रु. इतकं अनुदान देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना राबविण्यात येत आहे. जी अहिल्यादेवी शेळी योजना या नावाने सुद्धा सर्वश्रुत आहे. या योजने अंतर्गत राज्यातील 18 ते 60 या वयोगटातील अनुसूचित जाती / जमातीतील, दारिद्र्यरेषेखालील व अल्प भूधारक शेतकरी लाभ घेऊ शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक लाभार्थ्या कडून 25 डिसेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये महिला अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
होणाऱ्या खर्चात 60 टक्के केंद्र शासनाचा, 30 टक्के राज्य शासनाचा तर 10 टक्के लाभार्थ्यांचा हिस्सा असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी mahamesh.co.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.
अँण्ड्रॉईड मोबाइलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून Ahilya Yojana App डाऊनलोड केल्यानंतर मोबाइलमधूनही अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी अर्ज सबमिट करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.डी. कदम यांनी केले आहे.
याच योजनेशी मिळती जुळती योजना जिल्हा नियोजन समितीद्वारे सुद्धा राबवली जात आहे. या योजनेचे नाव जिल्हा नियोजन समिती योजना असे असून याद्वारे अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना 1 बोकड व 10 शेळ्या दिल्या जात आहेत. या योजनेत लाभार्थ्याला 75% अनुदान मिळू शकते.
या योजनेमध्ये तुम्ही उस्मानाबादी किंवा संगमनेरी जातीच्या शेळ्यांची निवड केली तर प्रति शेळी 6,000 व 1 बोकडासाठी 7,000 याप्रमाणे एकूण प्रकल्पखर्च 71239 रुपये इतका धरला जातो. या प्रकल्पामध्ये तुम्हाला 75% अनुदान मिळेल..
इच्छुक लाभार्थ्यांनी आजच्या आज कागदपत्रांसह एखादं CSC सेंटर गाठावं आणि त्वरित अर्ज करावा..