कमाईची मोठी संधी ! ‘या’ फळाची लागवड सुरु करा, शासनाकडून हेक्टरी मिळवा 2,22,665 हजारांचे अर्थसहाय्य ; पहा पात्रता, कागदपत्रे अर्ज प्रोसेस
सध्या भारतभर शेतकरी पारंपरिक शेती सोडून शेतात विविध प्रयोग करत असून व्यावसायिक शेतीकडे वळले आहे. तसेच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावे यासाठी शासन अनुदानही देत असून अनेक शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहेत.
आंबा, केळी आणि लिंबू नंतर भारतात घेतलं जाणारं चौथं मोठं व्यावसायिक फळ पीक पेरू आहे. पेरू खाण्यास अधिक रुचकर आणि गोड लागतो. यात अनेक औषधी गुणधर्मही आहेत. देश-विदेशातही पेरूला जबरदस्त मागणी आहे. त्यामुळे देशभरात पेरूची शेती होऊ लागली आहे. पेरू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही हात पुढे केला आहे. अशा परिस्थितीत पेरू लागवडीतून मोठे उत्पन्न मिळवण्याची संधी चालून आली आहे.
महाराष्ट्र सरकार देतयं अनुदान :-
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. तसेच फळे आणि भाजीपाला लागवडीवर अनुदान दिले जात आहे. यावेळी महाराष्ट्र कृषी विभागाकडून पेरू लागवडीसाठी विविध योजनेअंर्तगत अनुदान देण्यात येत आहे. यामध्ये पोकरा योजना म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवणी प्रकल्प या योजनेकरीता 5 हेक्टरी प्रमाणे 10 लाख 12 हजार रुपये अनुदान दिलं जातं.
यासाठी तुम्हाला dbt.mahapocra.gov.in/Registration वर नोंदणी करून अर्ज करावा लागेल. अधिक माहितीसाठी तुमच्या जिल्ह्याच्या सहाय्यक फलोत्पादन संचालकांशी संपर्क साधा. या योजनेचा लाभ राज्यातील या 5142 गावांसाठी मिळणार आहे.
या PDF फाईलमध्ये तुमचं गाव आहे की नाही ते शोधा – https://mahapocra.gov.in/site/NDKSP-List-of-5142-villages.pdf
तसेच राज्य सरकार मार्फत संपूर्ण राज्यभर फळबाग लागवड योजनेकरता महाडीबीटी पोर्टलवरही अर्ज करता येतो. त्यासाठी 50% अनुदान देण्यात येतं त्याची अर्ज प्रक्रिया आपण खाली पाहणार आहोत.
पेरू अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल ?
सर्वप्रथम तुम्ही राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर जावं लागेल.
त्यानंतर होम पेज वर तुम्हाला https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login करावं लागेल.
या ठिकाणी तुमचा युजर आयडी पासवर्ड (User ID Password) टाका. त्यानंतर कॅप्चा कोड भरून तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
लॉग इन केल्यानंतर तुम्हाला होमपेज तुमच्यासमोर उघडेल. या पेज वर तुम्हाला सरकारी योजना हा ऑप्शन दिसेल.
या मधून तुम्हाला ‘फलोत्पादन'(‘Horticulture’) नावाचा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला फलोत्पादन अर्जावरील संपूर्ण माहिती भरा.
त्यानंतर तुम्हाला ‘एकात्मिक फलोत्पादन’ हा ऑप्शन निवडा. यामध्ये तुम्हाला विविध फळांचे ऑप्शन दिसतील.
या फळांमधून तुम्ही ‘पेरू’ उत्पादन नावाच्या ऑप्शन वर क्लिक करा.
अर्ज भरून दिल्यानंतर मी अर्ज केलेलया बाबींवर जाऊन छाननी अंतर्गत बाबींचा समावेश न झाल्याने ते दाखवणार नाही. त्यासाठी तुम्हाला पुन्हा होमपेज वर जावं लागेल.
व तुम्ही निवडलेल्या बाबीची पूर्तता करावी लागेल. तसेच योजने बाबीचा अटी-शर्ती मला मान्य आहे, या गोष्टीवर क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे.अशाप्रकारे ड्रॅगन फ्रुट या फळ लागवडीसाठी तुम्ही शासकीय अनुदान मिळू शकतात…
औषधी गुणांनी परिपूर्ण आहे पेरू
पेरू हे औषधी गुणधर्माने समृद्ध फळ आहे. पेरूमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात. पेरूच्या अनेक जाती देखील आहेत – अलाहाबाद सफेदा, ऑर्क्स मृदुला, सरदार, श्वेता, पंजाब पिंक, अलाहाबाद सुरखाया त्यापैकी काही, कृषी तज्ज्ञांच्या मते, सुधारित पेरूची लागवड केल्यास सामान्य वाणांपेक्षा जास्त उत्पादन घेता येते.
या वाणांमध्ये व्हीएनआर बिही, अर्का अमुलिया, अर्का किरण, हिसार सफेदा, हिस्सार सुरखा, सफेद जाम आणि कोहिर सफेद या संकरित वाणांचा समावेश आहे..यापैकी तुमच्या वातावरणाशी सुसंगत अश्या प्रजातीची निवड करून पेरू उत्पादनातून भरघोस नफा तुम्ही कमावू शकता.
पेरूची लागवड सप्टेंबर-ऑक्टोबर आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये करता येते. मातीचे पीएच मूल्य 6 ते 6.5 दरम्यान असावे. त्याचे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी, त्याच प्रकारचे मातीचे शेत वापरा. पेरूच्या रोपाची लागवड केल्यानंतर 2 ते 3 वर्षांनी झाडाला फळे येऊ लागतात.