Take a fresh look at your lifestyle.

Gold Rate : सोन्याने गाठला 2 वर्षांचा रेकॉर्डब्रेक उच्चांक, तर चांदीही 71 हजारांच्या जवळ पोहचली, जाणून घ्या आजचे नवे रेट्स ..

0

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीने 2 वर्षातील उच्चांक गाठला आहे. आज, MCX वर सोन्याचे वायदे 0.6% वाढून 55,546 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, तर चांदी 1.4% वाढून 70,573 रुपये प्रति किलो झाली.

याआधी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. एमसीएक्सवर (MCX) सोने 2 वर्षांच्या विक्रमी उच्चांकावर व्यवहार करत आहे. कमोडिटी तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, सोने आणि चांदीच्या दारांत आणखी वाढ होईल अन् लवकरच सोन्याच्या दरांत रेकॉर्डब्रेक वाढ होईल..

सोने 57 हजार तर चांदी 72 हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता..

IIFL सिक्युरिटीजचे रिसर्चचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सांगितले की, जागतिक मंदीच्या भीतीने सोने आणि चांदी पुन्हा एकदा तेजीत आले आहेत. आज सोन्याच्या दराने मागील 2 वर्षांचा विक्रम मोडला आहे. येणाऱ्या बजेट – 2023 मध्ये किंवा त्यानंतर सोन्याची किंमत 57 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते. त्याचबरोबर चांदीची किंमत 72 हजार प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

वर्षाच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीने सकारात्मक गती..

कमोडिटी तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, 2023 च्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीने सकारात्मक गती दर्शविली आहे. अलीकडे सोन्याने 200 दिवसांची मूव्हिंग एव्हरेज (SMA) ओलांडली आहे. सोन्याला $1814-1801 जवळ सपोर्ट आणि $1838-1850 च्या जवळ रेजिस्टेंसचा सामना करावा लागेल.

चांदीला $23.72-23.55 वर सपोर्ट मिळाला आहे, तर रेजिस्टेंस $24.22-24.40 वर आहे. रुपयाच्या बाबतीत, सोन्याला 54,950-53,750 रुपयांचा सपोर्ट आहे, तर प्रतिरोधकता 55,480 रुपये, 54,650 रुपये आहे. चांदीला 69,050-68,580 रुपयांवर सपोर्ट आहे, तर प्रतिरोधक 70,420-70,780 रुपयांवर आहे. ही पातळी तुटल्यास सोन्या-चांदीमध्ये आणखी वाढ दिसून येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.