Take a fresh look at your lifestyle.

Google Pay ॲपवरून फक्त 2 मिनिटांत मिळवा 1 लाखांपर्यंत कर्ज! फॉलो करा या 8 Step, लगेच खात्यात होणार पैसे जमा..

0

गुगल इंडियाने छोट्या व्यापाऱ्यांना मदत करण्यासाठी गुगल पे ऍप्लिकेशनद्वारे कर्ज (GPay Loan) देण्याची सुविधा सुरू केली आहे. गुगल इंडियाने सांगितले की, भारतातील व्यापाऱ्यांना अनेकदा छोट्या कर्जाची गरज असते. या अंतर्गत, Google Pay द्वारे व्यापाऱ्यांना 15 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंतची छोटी कर्जे देखील दिली जात असून ज्याची परतफेड करण्याची किमान रक्कम फक्त 111 रुपयांपर्यंत आहे.

या अंतर्गत, 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते, जे 7 दिवसांपासून ते 12 महिन्यांच्या कालावधीत फेडता येते. छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज देण्यासाठी Google Pay ने DMI Finance सोबत भागीदारी केली आहे. इतकेच नाही तर, Google Pay ने ePayLater च्या भागीदारीत व्यापार्‍यांसाठी क्रेडिट लाइन सक्षम करण्याची सुविधा देखील सुरू केली आहे. याचा वापर करून, ग्राहक सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यापाऱ्यांकडून वस्तू खरेदी करू शकतात.

कर्ज कसे मिळवायचे ?

तुम्हाला Google Pay वरून व्यवसायासाठी कर्ज हवे असल्यास, सर्वप्रथम तुमचे Google Pay for Business ॲपवर खाते असणे आवश्यक आहे. तुम्ही 8 स्टेप्समध्ये Google Pay द्वारे व्यवसायासाठी कर्ज कसे मिळवू शकता ते जाणून घ्या..

सर्वप्रथम तुमचे Google Pay for Business ॲप उघडा.

यानंतर Loans सेक्शनमध्ये जा आणि Offers टॅब वर क्लिक करा.

तेथे तुम्हाला हवी असलेली कर्जाची रक्कम निवडावी लागेल आणि Get start वर क्लिक करावे लागेल. तुम्ही क्लिक करताच, तुम्हाला कर्ज देणाऱ्या भागीदाराच्या वेबसाइटवर रीडायरेक्ट केले जाईल..

यानंतर तुमच्या Google खात्यात लॉगिन करा. तुम्हाला तुमची वैयक्तिक माहितीही तेथे द्यावी लागेल. तसेच, कर्जाची रक्कम ठरवावी लागेल आणि कर्ज कोणत्या कालावधीसाठी घेतले जात आहे ते नमूद करावे लागेल..

यानंतर तुम्हाला तुमच्या फाइनल लोन ऑफरला रिव्हिव्ह करावे लागेल आणि लोन अग्रीमेंटला e-sign करावं लागेल..

हे सर्व केल्यानंतर, तुम्हाला काही KYC कागदपत्रे सबमिट करावी लागतील, ज्याद्वारे तुमचे व्हेरिफिकेशन केलं जाईल.

यानंतर, EMI पेमेंटसाठी तुम्हाला Setup eMandate किंवा Setup NACH वर क्लिक करावे लागेल.

पुढील स्टेप्समध्ये तुम्हाला तुमचा कर्ज अर्ज सबमिट करावा लागेल आणि तुम्हाला कर्ज मिळेल. तुम्ही तुमच्या ॲपच्या My Loan विभागात तुमच्या कर्जाचा मागोवा घेऊ शकता..

Leave A Reply

Your email address will not be published.