दसऱ्याच्या मुहूर्ताचे औचित्य साधून ठाण्यात तब्बल तीन हजार घरांची विक्री झाली. ग्राहकांनी घोडबंदर भागाला पसंती दिली असून, विकासकांनी गृहखरेदी करणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्या होत्या. त्यामुळे वन बीएचकेपेक्षा टू बीएचके घरांना यंदा अधिक पसंती मिळाली.
घोडबंदर, माजिवडा, कळवा, मुख्य भागातही तब्बल 5 कोटी पोखरण रोड नं. 2 किंवा ठाण्याच्या स्क्वेअर फुटांचे बांधकाम सुरू असून, दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल ३ हजार घरांचे बुकिंग झाले, अशी माहिती एमसीएचआयचे ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली.
ठाण्यात ग्राहकांना घरांचे अनेक पर्याय विकासकांनी उपलब्ध करून दिले आहेत. त्यात वन बीएचके, टू बीएचके, अगदी थ्री बीएचके फाईव्ह बीएचकेपर्यंतचे लॅव्हीश फ्लॅट उपलब्ध असल्याची माहिती विकासकांनी दिली. त्यात घरातील सदस्यांची संख्या वाढत असल्याने ग्राहक टू बीएचके फ्लॅटला अधिक पसंती देत असल्याचेही मेहता यांनी स्पष्ट केले.
घर खरेदी करताना इएमआय भरण्याचे विविध पर्याय देतानाच यात मुद्रांक शुल्क सवलत, जीएसटी पार्किंगसाठी मोफत सूट, जागा, घराचा ताबा घेताना 10 टक्के आणि उर्वरित रक्कम भरणे, घर खरेदी करणे आणि फ्लॅटचे भाडे मिळणे अशा विविध फायद्यांचा समावेश आहे. शिवाय कुठे फोन, कुठे एसी, कुठे फुल्ली फर्निश प्लॅट अशा भन्नाट ऑफरही विकासकांकडून देण्यात आल्या आहेत. घरांच्या किमतीदेखील 35 लाखांपासून ते अगदी दोन ते तीन कोटीपर्यंत असल्याचे दिसून आले. .
कुठे खरेदी कराल फ्लॅट, पहा लोकेशन अन् कॉन्टॅक्ट नंबर..
https://dosti1mumbai.com/?nis=8