शेतकऱ्यांना आज मिळणार दिवाळी भेट ! ते 13 लाख शेतकरी होणार पात्र, खात्यात 4 हजार रुपये होणार जमा, पहा जिल्हानिहाय याद्या..
‘पीएम किसान’ योजनेचा पुढील हप्ता तसेच ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई – केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्यासाठी ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम राज्य शासनामार्फत राबवण्यात आली.
यामध्ये सन्मान योजनांपासून दूर राहिलेल्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आल्याने आता वंचित राहिलेले 13 लाख 45 हजार शेतकरीही यासाठी पात्र झाले आहेत अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
कृषीमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुंडे यांनी कृषी, महसूल, भूमिअभिलेख आदी विभागांचा समन्वय साधून ई – केवायसी पूर्ण करणे, भूमिअभिलेखाच्या नोंदी अद्ययावत करणे, आदी बाबींची पूर्तता करून घेण्यासाठी मोहीम राबवली. यामध्ये राज्यातील आणखी 13 लाख 45 हजार शेतकरी या दोन्हीही योजनांच्या लाभास पात्र ठरवण्यात यश आले.
‘पीएम किसान’ योजना नव्याने सुरू करण्यात आली, त्यावेळी राज्यातील सुमारे 1 कोटी 19 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे 95 लाख शेतकरी पात्र ठरले.उर्वरित शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेता आला नाही. 95 लाखापैकी मृत, कर भरणारे व इतर कारणांनी रद्द करून 92.87 लाख शेतकरी पात्र ठरत आहेत. त्यापैकी 82.59 लाख शेतकऱ्यांची ई – केवायसी पूर्ण झालेली होती.
आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2 हजारांचा हप्ता..
आज (गुरुवारी दि.26 ऑक्टोबर) माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर येणार आहे. राज्यातील सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना 2 हजार रुपये प्रमाणे पहिल्या हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर वितरण करण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागाने 1720 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
‘पीएम किसान’ चा हप्ता कधी मिळणार ?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचाही 15 व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिवाळीआधी 15 वा हप्ता रिलीज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 4 हजारांचे गिफ्ट मिळणार आहे.
‘पीएम किसान’ लाभार्थी यादी पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
याआधी जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 वा हप्ता जारी करण्यात आला होता. 13 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जारी करण्यात आला. 14 वा हप्ता सुमारे 5 महिन्यांनंतर आला. याआधी, 12वा हप्ता ऑक्टोबर 2022 मध्ये आणि 11वा हप्ता मे 2022 मध्ये जारी करण्यात आला होता.
31 ऑक्टोबरपर्यंत E-KYC ची मुदत..
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना जोडण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून 31 ऑक्टोबरपर्यंत ब्लॉक आणि तहसील स्तरावर मोहीम राबवून शेतकऱ्यांचे E-KYC पूर्ण केले जात आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार दिवाळीपूर्वी 15 वा हप्ता पाठवणार आहे, याआधी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.