दिल्ली, पंजाब सरकारचे धोरण असो वा सध्या गुजरात इलेक्शन मध्येही मोफत वीजेची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. तुमच्या घरात एसी, हिटर आणि गिझरसारखी इलेक्ट्रिक उपकरणे असतील तर तुमचे वीजेचे बिल तुमचे खिसे मोकळे करण्यासाठी पुरेसे असतात. या 3 उपकरणांमुळे तुम्हाला नक्कीच 5 हजारांच्या पुढे लाईटबील येतं.
तसेच, तुम्ही भारतातल्या प्रत्येक राज्यात फ्री वीज बिलाचा आनंद घेऊ शकाल अशी स्थिती सध्या तरी नाही. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला वीज बिलापासून मुक्ती मिळवण्याचा फॉर्म्युला सांगणार आहोत. हो तुम्ही या पद्धतीचा अवलंब केला तर 1, 2 नाही तर तब्बल 25 वर्षे तुमचे वीज बिल शून्य असेल. चला तर याबद्दल सविस्तर माहिती घेऊया..
वीज बिलातून मुक्ती :-
एक मोठा सोलर पॅनल सेटअप बसवण्यासाठी सुमारे 1,20,000 रुपये इतका खर्च येतो. आता मात्र सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून तुम्हाला 40 टक्के अनुदान दिले जाणार आहे. केंद्र सरकारकडून घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. अनेक भारतीय नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन मोफत वीज वापरण्यास सुरुवात केली आहे.
यामध्ये तुम्ही तुमच्या घराच्या रिकाम्या छतावर अनेक सोलर पॅनल लावून घरी वीज निर्माण करू शकता. या योजनेचे नाव आहे सोलर रूफटॉप योजना, या योजनेचा फायदा घेतल्यास तुम्हाला केवळ एकदाच 72,000 रुपये भरावे लागेल. केंद्रामार्फत मिळणाऱ्या या सौर पॅनेलचे आयुष्य सुमारे 25 वर्षे आहे. अशा प्रकारे तुम्ही 25 वर्षांपर्यंत वीज बिलातून मुक्त होऊ शकता…
किती येईल खर्च ? समजून घ्या..
यासाठी तुम्हाला तुमच्या गरजेनुसार, 1,2,3 किलोवॅट सोलर पॅनल बसवावा लागेल.
एक किलोवॉट क्षमतेसाठी 46,820 रुपये खर्च येईल. एक ते दोन किलोवॉटसाठी 42470 रुपये प्रति किलोवॉट, दोन ते तीन किलोवॉट 41,380 रुपये प्रति किलोवॉट आणि तीन ते 10 किलोवॉट 40,290 रुपये प्रति किलोवॉट तसेच 10 ते 100 किलोवॅटसाठी 37,020 रुपये प्रति किलोवॉट असा खर्च येईल.
म्हणजेच तीन किलोवॉट क्षमतेची यंत्रणा बसवण्यासाठी 1,24,140 रुपये खर्च येईल. त्यामध्ये 40 टक्के अनुदानाप्रमाणे 49,656 रुपयांचे केंद्र सरकारचे अनुदान मिळेल व ग्राहकाला प्रत्यक्षात 74,484 रुपयांचा खर्च करावा लागेल…
Solar Rooftop Yojana : तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अर्ज कसा कराल ?
सोलर रूफटॉप योजनेसाठी उमेदवार त्यांच्या छतावर सोलर पॅनेल मोफत बसवण्यासाठी अधिकृत वेबसाइट solarrooftop.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या प्रक्रियेद्वारे जाणून घ्या..
solarrooftop.gov.in वर या अधिकृत व्हेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ‘Solar Rooftop Calculator’ हे कॅल्क्युलेटर देण्यात आलं आहे. यामध्ये तुम्हाला ‘Solar Panel Capacity you want to install’ यावर क्लिक करून तुमच्या किती किलोवॅट सोलर पॅनल लागणार आहे तसेच ‘Your budget’ इत्यादी माहिती भरून तुम्ही कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता…
या नंतर तुम्ही होम पेजवर Apply For Rooftop Solar पर्यायावर क्लिक करा.
पुढील पृष्ठावर आपल्या राज्याच्या वेबसाइटच्या css.mahadiscom.in लिंकवर क्लिक करा.
अर्ज तुमच्या समोर उघडेल.
फॉर्ममध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
सौर रूफटॉप योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
टीप : तुम्ही हा फॉर्म जनसेवा केंद्रावरही भरू शकता..
गीझर एसी आणि हीटर पाहिजे तेवढा वापरा :-
सरकार केवळ मोनोपार्क बायफिशियल तंत्रज्ञानासह सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान देते. यामध्ये मागच्या बाजूला पॉवर जनरेटर उपलब्ध आहे. हे 4 सौर पॅनेल एकत्र जोडून तयार केले जाते.
यातील 2 किलोवॅटचे 4 सौर पॅनेल दररोज 6 ते 8 युनिट वीज निर्माण करतात. याच्या मदतीने 2 ते 3 पंखे, फ्रीज, एसी, गीझर, हीटर, टीव्ही अशी इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालवता येतील.