अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी वांबोरी मध्ये भूमी इनरिच कंपनीतर्फे एका शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला परभणीतील प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील उपस्थिती लावली होती. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांचा खुप विश्वास आहे.

हवामान विभागातर्फे वर्तवला जाणाऱ्या अंदाजाच्या तुलनेत पंजाबरावांचा हवामानाविषयीचा अंदाज अचूक आणि समजायला सोपा आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकरी बांधवांच्या मते, याचा त्यांना शेतीचे नियोजन करताना खूप फायदा होतो. या मेळाव्या दरम्यान पंजाबराव डख अहमदनगर जिल्ह्यात आले असता त्यांनी आपला नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे.

या शेतकरी मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून पंजाबराव डख हे उपस्थित राहिले होते. या वेळी त्यांनी मेळाव्या दरम्यानच आपला नवीन हवामाना बद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नव्या हवामान अंदाजानुसार, आज पासून ते 5 डिसेंबर पर्यंत अहमदनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे.

पंजाबरावांचा अंदाज खरा ठरला तर यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे. त्यातच अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याचे डख यांनी या कार्यक्रमाच्या वेळी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले आहे. पंजाबरावांच्या मते अहमदनगर जिल्ह्यात 12 डिसेंबर पासून ते 14 डिसेंबर पर्यंत म्हणजेच तीन दिवस पावसाची शक्यता आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अवकाळी पाऊस होणार हे लक्षात घेऊन, शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीमधील कामांच नियोजन आखण गरजेचे आहे. पंजाबराव डख यांनी या कार्यक्रमादरम्यान मान्सून आगमनाची स्थिती देखील स्पष्ट केली आहे.

पंजाबरावांच्या मते मान्सून हा पश्चिमेकडून अर्थातच मुंबईमधून महाराष्ट्रात दाखल होत असतो. मात्र आता गेल्या दोन वर्षात मान्सून हा नागपुर म्हणजेच पूर्वेकडून दाखल होत आहे. ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सांगितले. यासर्वाला ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढ देखील पाऊस वाढीसाठी कारणीभूत ठरत आहे, असं मत यावेळी पंजाब रावांनी व्यक्त केल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *